Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

पीएम मोदींचा प्लास्टिकविरोधात एल्गार

Share

मन की बात कार्यक्रमातून अभियानाची घोषणा

नवी दिल्ली – स्वच्छ भारत अभियानानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात मप्लास्टिकमुक्त अभियानफ सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आहे. यानिमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबण्यात येणार आहे. ममन की बातफ या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली.
कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.25) प्रथमच आकाशवाणीवर मन की बातफमधून देशवासियांशी संवाद साधला. श्री कृष्ण जन्माष्टमीनिमीत्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्ताच्या आठवणीने मोदींनी कार्यक्रमाला सुरूवात केली.

गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त गांधींजींना हागणदारीमुक्त भारत भेट देऊ आणि प्लॅस्टिकच्या विरोधात एका जन आंदोलनाची सुरूवात करू असे मोदी म्हणाले. प्लास्टिक पिशवी मिळणार नाही, असा प्रचार व्यापारी आणि दुकानदारांनी करायला सुरूवात केली. सर्वांनी एकदाच वापरता येणार्‍या प्लॅस्टिकचा वापर टाळायला हवा असे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.

प्लास्टिकचा वापर कमी करुन पैसे आणि पर्यावरणाचे रक्षणही करता येईल. प्रत्येक नागरिकाने यामध्ये आपले योगदान द्यायला हवे, असे आवाहन मोदींनी मन की बात मधुन जनतेला केले. तसेच 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंटफ सुरू करण्याची घोषणा यावेळी मोदींनी केली. मॅन व्हर्सेस वाइल्डफ या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्गाप्रति असलेली संवेदनशीलता आदी गोष्टींची जगाला ओळख होईल असेही मोदी म्हणाले.

जन्माष्टमीचा उल्लेख करताना मोदींनी भगवान श्री कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण दिले. सध्या देशात अजून एका उत्सवाची तयारी सुरू असून तो उत्सव म्हणजे महात्मा गांधींची 150 वी जयंती असं मोदींनी नमूद केले. तसंच, सामान्य व्यक्ती श्रीकृष्णाच्या जीवनातून वर्तमानातील समस्यांवर उपाय शोधू शकतो. एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे.

11 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हे अभियानाला सुरूवात –

महात्मा गांधी हे शेतकरी, कामगार यांच्यासाठी लढले, सर्वसामान्यांच्या सेवेत आपले आयुष्य वाहून घेतले. त्यांच्याशी निगडीत असलेल्या अनेक महत्त्वांच्या वास्तूंवर जाऊन त्यांना वंदन करण्याची संधी मिळाली. गेल्या काही वर्षांपासून आम्ही दोन ऑक्टोबरच्या आधी जवळपास दोन आठवड्यापर्यंत देशभरात स्वच्छता ही सेवा हे अभियान सुरू करतो. यंदा हे अभियान 11 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!