Type to search

Featured maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

केदारनाथ जवळच्या पवित्र गुहेमध्ये मोदींची ध्यानधारणा

Share
केदारनाथ – उद्या रविवारी लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचे मतदान होणार आहे. तत्पूर्वी सातव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) सकाळी उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदी केदरानाथ जवळील एका गुहेमध्ये ध्यानाला बसले. मोदी स्वत: 2 किलोमीटर पायी चालत गुहेपर्यंत गेले.

प्रसारमाध्यमांच्या विनंतीवरुन त्यांनी गुहेमधील काही फोटो काढण्याची परवानगी दिली. सकाळपर्यंत मोदींची ही ध्यान धारणा चालेल. त्यानंतर उद्या (रविवारी) ते बद्रिनाथला जाणार आहेत. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे म्हटले आहे. प्रसारमाध्यम किंवा कुठल्याही व्यक्तीला गुहेच्या आसपासच्या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. पंतप्रधान मोदी आज (शनिवारी) सकाळी 9.30 च्या सुमारास डेहराडूनच्या विमानतळावर उतरले आणि विशेष हेलिकॉप्टरने केदारनाथला आले. केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी परिसरात सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेतला.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात आले. तिथे त्यांनी विधीवत पूजा केली आणि विजयासाठी साकडं घातलं. रविवारी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन विधीवत पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक गढवाली पोशाखही परिधान केला होता. नरेंद्र मोदी हे 19 तारखेला म्हणजेच उद्या बद्रीनाथच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत अशीही माहिती समजते आहे. केदारनाथ मंदिराबाहेर आल्यानंतर मंदिराबाहेर असलेल्या भाविकांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. इतकंच नाही तर काही भाविकांनी फूल देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागतही केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!