Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत मोदींनी साजरी केली दिवाळी

Share

उत्तराखंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यावर्षी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिल गावात आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. उंच बर्फाळ पर्वतरांगांमध्ये तुम्ही ज्या निष्ठेने कर्तव्य बजावताय त्यामुळे देशाला बळ मिळते. तुमच्यामुळे देशातील १२५ कोटी जनतेची स्वप्ने आणि भविष्य सुरक्षित आहे असे पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मागच्यावर्षी पंतप्रधानांनी काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवांनासोबत दिवाळी साजरी केली होती. मोदी पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक दिवाळी जवानांसोबत साजरी करत आहे. यंदाचे पाचवे वर्ष आहे. जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले व तिथे सुरु असलेल्या निर्माण कार्याचा आढावा घेतला.

केदारनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून ही सजावट अत्यंत उठून दिसते आहे. केदारनाथाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड प्रलयावर काढण्यात आलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही पाहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!