Type to search

मुख्य बातम्या राजकीय

पंतप्रधान मोदींचा चंद्रबाबू नायडू यांच्यावर निशाणा

Share

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला आहे. राज्याचा विकास सोडून मोदींना शिव्या देण्याची स्पर्धेत ते सारे काही विसरल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिणेतील तीन राज्य आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशच्या गुंटूरमधील जनसभेत हे भाष्य केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचे आश्वासन जनतेला दिले. यासोबतच विरोधकांवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री चंद्रबाबू यांना थेट लक्ष्य केले.

आंध्र प्रदेशमधील गुंटूरमधल्‍या जनसभेत मोदी म्‍हणाले की,  चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते उद्या दिल्लीत फोटो काढण्यासाठी जात आहे. परंतु भाजपा आपल्या कार्यकर्त्यांच्या पैशाने कार्यक्रम करते, तर हे आंध्रच्या जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत.

२०१४ ला आमचे सरकार आले तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिलं. २०१६ मध्ये ते पॅकेज लागूही करण्यात आले. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्यासारखीच मदत मिळाली. आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्ट स्वीकारून केंद्राचे आभार मानले होते. परंतु केंद्रानं दिलेल्या पॅकेजचा आंध्र सरकारनं योग्य वापर केला नाही. राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीनं नंतर यू-टर्न घेतला, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे. आमचा उद्देश स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी धन निर्माण करण्याचा आहे.

पंतप्रधान रॅलीला विरोध

चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान रॅलीला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर, तामिळनाडूती तिरुपुर आणि कर्नाटकमधील हुबळी मध्ये रॅली करणार आहेत. तेलुगू देशम पार्टी ( टीडीपी) प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधानांच्या यात्रेस काळा दिवस म्हटले आहे. पंतप्रधानांच्या आंध्र प्रदेश दौऱ्याआधी मोठमोठे पोस्टर्स लागले आहेत. यामध्ये पंतप्रधानांना विरोध केला जात आहे. ‘मोदी नेवर अगेन’ असे या पोस्टर्समध्ये म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!