Type to search

Breaking News Featured देश विदेश न्यूजग्राम मुख्य बातम्या

तुमचे फ्रान्ससोबत मेहनतीचे आणि भारतासोबत मातीचे नाते आहे; मोदींनी साधला भारतीयांशी संवाद

Share

फ्रान्स | वृत्तसंस्था 

भारतातून तुम्ही इथे मेहनतीसाठी आला आहात. भारताशी तुमचे नाते हे मातीचे आहे तर फ्रान्ससोबत तुमचे नाते मेहनतीचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते फ्रान्समधील भारतीयांशी संवाद साधत होते.

ते म्हणाले, आज सर्वजन याठिकाणी मोठ्या संख्येने आलात. भारताशी तुमचे नाते मातीचे आहे. फ्रान्समध्ये येऊन तुम्ही तुमचे कष्ट दाखवून देत आहात. इथल्या मातीशी तुमचे नाते हे मेहनतीचे आहे.

 

भारत आणि फ्रान्सचे संबंध खूप चांगले आणि जुने आहेत. प्रत्येक परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या सोबतीला उभे राहतात. तसेच  ‘फ्रेंच फुटबॉल टीमचे भारतात मोठे चाहते आहेत.

देशात बँक खाते उघडण्यात विक्रम झाला आहे. आजच्या नव्या भारतात भ्रष्टाचार हद्दपार झाला आहे. भाई-भतीजावाद, परिवारवाद, जनतेच्या पैशांची आता लुट होत नाहीये. दहशतवादावर अंकुश मिळविण्यात यश आले असल्याचे मोदी म्हणाले.

प्रारंभी, फ्रान्सच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत झाले. पॅरिस विमानतळावर गुजरातमधील दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाने पंतप्रधान मोदींचे तिरंगा फडकवत स्वागत केले.

यावेळी भारतीयांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला.

मात्रभारताच्या पंतप्रधानांचे मुस्लीम समाजाने केलेले हे स्वागत पाकिस्तानला फारसे आवडले नाही. भारत सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार करणाऱ्या पाकिस्तानच्या एका मंत्र्याने यासंदर्भात ट्विट करुन आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!