Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Mann Ki Baat : पंतप्रधानांनी साधला जनतेशी संवाद

Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित  केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा 49वा मन की बात कार्यक्रम होता. दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात.

मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी देश आणि जगातीक समस्यांवर भाष्य करतात आणि जनतेने सुचविलेल्या विचारांवरही बोलतात.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचाही उल्लेख केला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं.

दोन दिवसांनंतर म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची जयंती आहे. यावेळी, गुजरातमध्ये तयार होत असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा बहुचर्चित आणि जगातला सर्वांत मोठा पुतळ्याचं 31 ऑक्टोबरला अनावरण करणार असल्याची माहिती मोदींनी दिली.

यानिमित्ताने पंतप्रधान मोदी अहमदाबाद येथील ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’चेही लोकार्पण करतील. याच दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही पुण्यतिथी आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!