Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या सार्वमत

राज्यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी होणार नाही असे नियोजन करावे – पंतप्रधान

Share

सार्वमत

मुंबई – लॉकडाऊन संपले नसून खर्‍या अर्थाने आता कोरोनाशी लढाई सुरू झाली आहे, राज्यांना देण्याच्या परताव्यातील 11 हजार कोटी रूपयांची रक्कम आम्ही तातडीने सर्व राज्यांना देत आहोत, मात्र लॉकडाऊनचा कालावधी संपविल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन करा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. त्यात अनेक महत्वपूर्ण सूचना त्यांनी राज्यांना दिल्या.

देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते, पण आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले नाही. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे महत्वाचे काम करायचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोगही होऊ शकतो. ही 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका, असे मोदी यावेळी म्हणाले.

कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञांचा उपयोग करा, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती, तज्ञ, यांचे टास्क फोर्स तयार करा, त्यांना वेगवेगळ्या जबाबदार्‍या द्या, सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत या दृष्टीने संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिध्दही मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.

आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल. पण एकदम सर्व गर्दी होईल ग्रामीण भागात असे करू नका. त्याची विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकर्‍यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होउ न देता नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रतिकार शक्ती वाढवा आयुष्य मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरू होते. त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या महत्वाच्या सूचना – 
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलेल्या काही महत्वाच्या सुचना-
1. लॉकडाऊन संपविल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे.

2. देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते पण खर्‍या अर्थाने आत्ता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले झाले नाही. आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.

3. कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञांचा उपयोग करा.

4. कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

5. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती, तज्ञ, यांचे टास्क फोर्स तयार करा, त्यांना वेगवेगळ्या जबाबदार्‍या द्या.

6. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्याव=याचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिध्दही मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

7. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल. पण एकदम सर्व गर्दी होईल ग्रामीण भागात असे करू नका. त्याची विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकर्‍यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

8. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी हो न देता नियोजन करा.

9. 11 हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

10. आयुष्य मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

11. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहेत. आपणही जपून राहिले पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!