साक्रीत विमान कोसळले; सहा जखमी

0
धुळे | जिल्ह्यातील साक्री जवळ प्रशिक्षणार्थी विमान कोसळून पायलटसह इतर पाच प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाले आहेत. रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना साक्री उपजिल्हा रुग्णालयातून धुळे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील गोंदूर येथे विमान प्रशिक्षण केंद्र आहे. मुंबई फ्लायिंग क्लबचे विमान एका पायलटसह इतर ५ प्रशिक्षणार्थी पायलटांना प्रशिक्षण देत होते. साक्रीपासून १२ किमी अंतरावर दातर्ती म्हणून एक खेडेगाव आहे तेथील बस स्थानकाजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास मोठा आवाज होऊन विमान दुर्घटनाग्रस्त झाले.

जखमी चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर कॅप्टन जे पी शर्मा

विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या दुर्घटनेतील जखमींना  धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विमानात चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर कॅप्टन जे पी शर्मा यांनी शर्थीने विमान जमिनीवर लॅन्ड केले. त्यांचेसोबत इतर पाच ट्रेनी पायलट होते. विमानातील कॅप्टन यांच्या डोक्याला दुखापत झाली असून इतर दोन प्रशिक्षणार्थी पायलटला किरकोळ जखम झाली आहे.

विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर या परिसरात प्रचंड आवाज झाल्यामुळे आणि सोशल मीडियातून या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यामुळे अद्यापही याठिकाणी बघ्यांची अभूतपूर्व गर्दी झाली आहे.

घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून तपास सुरूं आहे. घटनास्थळी तहसीलदार संदिप भोसले व पोलिस उप अधिक्षक निलेश सोनवने व पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

LEAVE A REPLY

*