Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

पिस्तुलातून गोळी उडाली; नगरमध्ये एकाचा मृत्यू

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)– झेंडीगेट येथील सरकारमान्य शस्त्रगृहामध्ये ठेवलेल्या पिस्तुलातून सुटलेली गोळी लागून जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक मार्कस वाघमारे (वय 57) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली.

वाघमारे यांचे मित्र नौशादवान इराणी यांचे नगरमधील झेंडीगेट येथे आर्म स्टोअर्स नावाचे दुकान आहे. वाघमारे हे इराणी यांना भेटण्यासाठी त्यांच्या दुकानात आले होते. त्यावेळी तेथे पिस्तूल स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. त्यावेळ पिस्तुलातून गोळी सुटली. ती वाघमारे यांच्या छातीत घुसली. त्यात ते गंभीर जखमी झाले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुण्याला उपचारासाठी हलविण्यात आले. तिथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यासंबंधी कोतवाली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अद्याप कोणाविरूद्धही गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणी नेमकी चूक कोणाची, हे स्पष्ट होताच गुन्हा दाखल होईल, असे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!