Type to search

Breaking News जळगाव

चाळीसगाव बामोशी बाबा दर्गा : अनधिकृतपणे राहणाऱ्यांवर पोलीसांची नजर

Share

चाळीसगाव प्रतिनीधी –

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या शहरातील बामोशी बाबा पिर मुसा कादरी बाबा दर्गावर उपचाराच्या नावाखाली वर्षेनुवर्षे राहत असलेल्यांची चाळीसगाव शहर पोलीसांनी चौकशी करुन ज्यांचा या दर्गावरील उपचाराशी काहीएक संबंध नाही अशांना हाकलून लावले आहे.

सदर कारवाई दि.१७ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान करण्यात आली असुन दर्गा समोर असलेल्या प्रसाद व फुल विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात कोणाला थांबु देवु नये अशा नोटीसा बजावल्या आहेत.

सर्व धर्मीयांचे प्रतिक बामोशी बाबा दर्गावर मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात मानसिक आजार असलेले रूग्ण बरे होण्याच्या आशेने येतात. त्यामुळे हा दर्गा बारामाही गजबजलेला असतो. मात्र उपचाराच्या नावाखाली अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांचे वास्तव्य या दर्ग्यावर असल्याची चर्चा अनेक वर्षापासून होत आहे. या दर्ग्यावर रात्री मुक्काम ठोकायचा आणि दिवसा कुठेही कामधंदा वा इतर कामे करायची असा उद्योग काही जण करतात. अनेक जण तर गेल्या अनेक वर्षापासून या दर्गावर झोपड्या करून अनाधिकृतपणे राहत आहेत.

गुन्हेगार,चोर, हिस्ट्रीसिटर अशांच्या विरोधात शहर पोलीसांनी ऑपरेशन मोहीम उघडली आहे. त्या अनुषंगाने १७ रोजी सायंकाळी ५ ते ७ असे तीन तास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी बामोशी बाबा दर्गावर बामोशी बाबा ट्रस्टच्या मदतीने शोधमोहीम राबविली. या मोहीमेत दर्गावर वास्तव्य करून असणाऱ्यांची सखोल चौकशी केली असता बहुताश जणांकडे आधारकार्ड, मतदान कार्ड,रेशनकार्ड आढळून आली नाही.त्यामुळे अशा लोकांना दर्ग्यावरून हाकलून देण्यात आले. जे रूग्ण उपचारासाठी येथे दाखल असतीत तो रूग्ण व त्याचा एक नातेवाईक एवढेच लोक थांबतील अशी भूमिका पोलीसांनी घेतली.

फुलहार, प्रसाद विक्रेत्यांना नोटीसा

बामोशी बाबा दर्गाच्या बाहेर दोन्ही बाजूंना फुल व प्रसाद विक्रेत्यांची दुकाने आहेत. त्यातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या मागेच अनाधिकृत लॉजेस उभारले आहेत. त्याठिकाणी भविष्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून या दर्गा परिसरातील फुलहार,प्रसाद विक्रेत्यांना पोलीसांनी नोटीसा बजावून यापुढे अनाधिकृतपणे लॉजेस उभारून कुणाला रहिवास दिल्यास संबंधीतांविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!