Thursday, April 25, 2024
Homeधुळेलाचखोर तलाठी गजाआड

लाचखोर तलाठी गजाआड

पिंपळनेर 

पीक कर्ज घेण्यासाठी सातबारा उतार्‍यावर बोजा चढवून देण्याकरिता हजार रुपयाची लाच मागणार्‍या तलाठी शरद कोठावदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. या संदर्भात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तक्रारदाराने युनियन बँकेच्या पिंपळनेर शाखेकडे पीक कर्जासाठी अर्ज सादर केला होता. मात्र त्यासाठी शेतजमीनीच्या सातबार्‍या उतार्‍यावर बोजा चढविणे आवश्यक असल्याने त्यांनी तलाठी शरद जगन्नाथ कोठावदे याची भेट घेतली. या कामाकरीता तलााठी कोठावदे याने हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंदक विभागाच्या धुळे कार्यालयाकडे संपर्क साधून रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार काल पिंपळनेरातील पंचायत भवनाजवळ सापळा रचून तलाठी कोठावदे यास रंगेहात पकडण्यात आले.

या विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक सुनिल कुराडे, निरीक्षक मनजीतसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महसुल विभागात मोठ्या प्रमाणात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी सर्वस्तरातून आता केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या