Type to search

Featured जळगाव

भुसावळ : रोटाव्हेटरमध्ये अडकून युवकाचा मृत्यू

Share

 भुसावळ : तालुक्यातील पिंप्रीसेकम येथे रोटाव्हेटरमध्ये अडकल्याने १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ रोजी  दुपारी घडली.

याबाबत तालुका पोलिसात ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्रीसेकम शिवारातील सतीश बुवा यांच्या शेतात ट्रॅक्टर चालक गोलू उर्फ किशोर तायडे हा निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवित असतांना त्याच्या ट्रॅक्टरची क्र. एम.एच.१९ जी.व्ही.००७५ ची धडक पवन विलास तायडे (१९, रा. पिंप्रीसेकम, ता. भुसावळ) असे तरुणाला लागल्याने तो ट्रॅक्टरला मागे जोडलेल्या रोटोव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. त्यात त्याचा मृत्यु झाला.

या घटनेनंतर चालक गोलू तायडे  हा घटनास्थळावरुन पसार झाला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात योगेश कैलास तायडे यांच्याफिर्यादीवरून तालुका पोलिसात  चालक गोलू तायडे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पो.नि. रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पवार तपास करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!