Type to search

maharashtra धुळे

विद्यार्थ्यांनी जिज्ञासा कायम ठेवावी!

Share
पिंपळनेर । वार्ताहर- गरज ही शोधाची जननी आहे. प्रत्येक समस्येकडे वैद्यानिक दृष्टीकोनातून पाहून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक जण शास्त्रज्ञ होवू शकतो. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समस्या जाणून घेवून त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा, आपली जिज्ञासा कायम ठेवावी असे आवाहन राज्य विज्ञान मंडळाचे सहकार्यवाहक सुहास सोनवणे यांनी केले. दिघावे (साक्री) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजीत अपुर्व विज्ञान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

मेळाव्याची सुरूवात स्वागत गीताने झाली. या मेळाव्यात गावाचे नवनिर्वाचीत सरपंच सौ.मीनाबाई पानपाटील, ग्रा.प सदस्य राजेंद्र अहिरराव, उज्वलाबाई पवार, विश्वास अहिरराव, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.देवरे व उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य विज्ञान मंडळाचे सहकार्यवाहक सुहास सोनवणे होते.

विद्यार्थ्यांमधूनच वैज्ञानिक कसे निर्माण होतात हे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी.झेड. कुवर होते. त्यांनी विज्ञान व अंधश्रध्दा याविषयी मार्गदर्शन केले. विज्ञान मंडळाचे कार्यवाहक तथा वसंतदादा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस.बच्छाव यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके करून दाखवली. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा सल्ला श्री.बच्छाव यांनी दिला.

प्रस्तावना विद्यालयाचे विज्ञान शिक्षक ए.एस.पाटील यांनी केली. मान्यवरांचा परिचय श्री.जगताप, श्री.बावा, राणे, श्रीमती ब्राम्हणकार यांनी केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.मराठे यांनी अपुर्व विज्ञान मेळावा संबंधी माहिती दिली. सुत्रसंचलन के.वाय.अहिरराव तर आभार एस.एम.सोनवणे यांनी मानले. उपकरणाचे परीक्षण के.बी.अहिरे तर तक्ता परीक्षण अभिजीत सोनवणे यांनी केले.

या मेळाव्यात विद्यालयातील एकुण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यानुभव विषयांतर्गत विविध वस्तु, ग्रिटींट कार्डस्चे प्रदर्शनात मांडणी श्रीमती एन.एम.बेडसे, श्रीमती एस.एम.गावीत यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.टी.एखंडे, आर.आर.गावीत, यु.सी.सुर्यवंशी, व्ही.जी.ठाकरे, विकास अहिरराव, श्री.हिरे, श्री.गांगुर्डे वएस.आर.विधाते यांनी परीश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!