Video : पिंपळगाव टोलनाका शेतकऱ्यांनी केला खुला

0
पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या पीएनजी टोल-वे कंपनीच्या टोलनाक्यावर मंगळवारी स्थ्लृानिक शेतकर्‍यांनी आंदोलन केले.
जिल्ह्यातील शेतकर्‍याकडून तीनपट टोल आकारणीच्या विरोधात तब्बल  तास भर टोल खुला करुन आंदोलन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पिंपळगाव बसवंत येथे टोल नाका स्थापन झाल्यापासूनच तो वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. याठिकाणी कर्मचार्‍यांची दादागिरी, टोल कंपनीची सुलतानी टोल वसुली यासह अनेक समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागते.
अशातच नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या बाहेरील पासिंगच्या गाड्यांना पुर्ण टोल आकारण्याचा मुद्दा पुन्हा चिघळला.
त्यामुळे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अश्‍विन गागरे-पाटील, दीपक गोसावी, बाळासाहेब आंबेकर, प्रशांत घोडके, शरद सोनवणे, रोहित कापुरे, इमरान शेख, टोनी बागुल, प्रशांत काळे, दीपक विधाते यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकर्‍यांनी टोल नाक्यावर जात अर्धा तास टोल खुला करुन दिला.
त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. शेतकर्‍यांचा उद्रेक पाहून पिंपळगाव बसवंत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळविले. आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
जोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बाहेरील पासिंगच्या वाहनांकडून लोकल टोल आकारण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांच्या वतीने सतीश मोरे, अश्‍विन गागरे-पाटील यांनी दिला.
आंदोलकांचा उद्रेक होत असताना ‘सहकार’ कंपनीचे व्यवस्थ्लृापक संतोष चव्हाण, संदीप सिंग हे आंदोलकांची मागणी मान्य करण्यास तयार नव्हते. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची परिस्थ्लिृती निर्माण झाली होती. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी टोल कंपनीच्या व्यवस्थ्लृापकांना शेतकर्‍यांच्या मागणीबाबत तत्काळ वरिष्ठांची बोलण्यास सांगितले.
तसे झाले नाही तर संभाव्य उद्भवणार्‍या परिस्थ्लिृीतीला सर्वस्वी टोल प्रशासन जबाबदार राहील, असे सांगितल्यानंतर चव्हाण यांनी राष्ट्रीय राजमार्ग रस्ते प्राधिकरणचे व्यवस्थ्लृापक प्रशांत खोडस्कर यांच्या संपर्क साधून शेतकर्‍यांच्या मागणीबाबत माहिती दिली.
त्यानंतर खोडस्कर यांनी जिह्यातील शेतकर्‍यांच्या बाहेरील पासिंगच्या वाहनधारकांकडून ओळखपत्र दाखवून स्थानिक टोल आकारण्याबाबत तत्वत: मान्यता दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
परंतु, आंदोलकांना तसे लेखी अद्याप दिलेले नाही. त्यामुळे आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
आंदोलनात बाळासाहेब आंबेकर, दिपक गोसावी, अजित कराटे, अशोक विधाते, अरविंद जाधव, किशोर ठोंबरे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*