लग्नाच्या मांडव डहाळ्याऐवजी काढली रोपांची मिरवणुक

0

पिंपळगाव बसवंत (वार्ताहर ) ता. १७ : झाडे लावा झाडे वाचवाचा संदेश देत वृक्षांची काढलेली मिरवणूक पिंपळगावमध्ये चर्चेचा विषय ठरली.

पारंपरिक प्रथांना फाटा देत ही आगळी मिरवणूक विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी आनंद गांगुर्डे यांचे बंधू किरण गांगुर्डे यांच्या विवाहसोहळ्यानिमित्त काढण्यात आली.

पिंपळगाव बसवंत येथे पारंपरिक पद्धतीला फाटा देत रोपांच्या कुंड्यांची मिरवणूक काढण्यात आली

विवाहसमारंभासाठी ग्रामीण भागात मांडव डहाळे करण्याची पद्धत आहे. यावेळी आंबा, जांभूळ आदी वृक्षांच्या फांद्या तोडून वाजत गाजत घरावर टाकण्याची रित असते.

मात्र गांगुर्डे परिवाराने वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होईल म्हणून या प्रथेला फाटा देत रोपांच्या कुंड्यांची मिरवणूक काढून पर्यावरण जागराचा संदेश दिला.

नवीन जोडप्याच्या हाताने या वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याचे गांगुर्डे परिवाराने देशदूत प्रतिनिधीला सांगितले.

त्यांच्या या वृक्षप्रेमाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*