Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : पिंपळगावात भर रस्त्यात दोन वळूंची दीड तास झुंज; नागरिकांची धावपळ

Share

पिंपळगाव बसवंत  | वार्ताहर 

पिंपळगाव बसवंत येथील मुंबई आग्रा महामार्गावर भर रस्त्यात दोन वळूंची झुंज सुरु झाल्याने नागरिकांची धांदल उडाली होती. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अखेर अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून झुंज सोडवली.

अनेकांनी या रस्त्याने जाणे टाळले होते. अर्ध्या रस्त्यावरून अनेकांनी मार्ग बदलले.  पायी जाणाऱ्या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उतरून मार्ग काढला.

अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरातील रहिवाशांनी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या अग्निशमन विभागास याबाबत माहिती दिली. यानंतर अग्निशमनच्या पाण्याच्या मारामुळे दोन्ही वळूंची झुंज सोडण्यात यश आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!