Type to search

Featured धुळे फिचर्स

पिंपळनेर अपघात : दोन युवक ठार, पोलीस शिपाई जखमी

Share

पिंपळनेर  –

साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील नवडणे फाट्यानजीक दोन दुचाकी व इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पिंपळनेरचे दोन युवक जागीच ठार झाले तर पिंपळनेर पोलीस ठाण्याचा शिपाई गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात काल रात्री 8.30 वाजता झाला.सागर अशोक जाधव उर्फ गजू व हेमराज अनिल सोनवणे अशी दोघा मयताची नावे आहेत.

सागरची एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख होती. तो आपला व्यवसाय सांभाळून पिंपळनेर शहर व परिसरात सुख-दुःखाच्या प्रसंगी मदतीसाठी धावून येत होता. काल देखील त्याचा मित्र हेमराज अनिल सोनवणे याला डायलिसिससाठी धुळ्याला घेऊन गेेला होता.

परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील नवडणे फाट्यानजीक दोन दुचाकी व इंडिका यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. त्यात सागर व हेमराज हे दोघे जागीच ठार झाले. सागर याच्या पश्चात आई, वडील, मुलगा, गर्भवती पत्नी असा परिवार आहे.

हेमराज हा देखील परिस्थितीशी दोन हात करत व स्वतःच्या गंभीर आजारात देखील आपल्यातील कलागुण जोपासत वेगवेगळ्या उपक्रमात सातत्याने सहभागी होत होता. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गावातीलच इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करून कुटुंबियांना मदतीचा हातभार लावत होता.
तर या अपघातात धुळ्याहून पिंपळनेरकडे येणारा पिंपळनेर पोलीस ठाण्याचा शिपाई विजय बापू चौरे हा गंभीर जखमी झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!