आंबिया बहार, गारपीट : हवामान आधारीत पिक विमा योजना नगर जिल्ह्यात यंदाही लागू

0

द्राक्ष, डाळिंब, आंबा, पेरू व लिंबाचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)-प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना 2017 (आंबीया बहार व गारपीटमध्ये) द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, पेरू व लिंबू या फळ पीकांकरीता लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील महसूल मंडलनिहाय फळ पीक निहाय प्रमाणकानुसार लागू करण्यात येत आहे.
हवामान केंद्रांची आकडेवारी आणि फळ पीक निहाय प्रमाणके यांची सांगड घालून शेतकर्‍यांना संबंधित विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई परस्पर बँकेद्वारे अदा करण्यात येणार आहे. नुकसान भरपाईचे कोणतेही दायित्व शासनावर राहणार नाही असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यासाठी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेत संबंधित फळ उत्पादक तसेच कुळाणे अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही पात्र आहेत. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर आहे अशा सर्व शेतकर्‍यांना ही योजना सक्तीची राहील.
बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ही योजना ऐच्छिक राहील. या योजनेत सहभागी झालेल्या कर्जदार/बीगर कर्जदार शेतकर्‍यांसाठीच या योजनेतील गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील. बँक सेवा शुल्कपोटी शेतकर्‍यांकडून जमा केलेल्या विमा हप्त्याच्या 4 टक्के रक्कम विमा कंपनीकडून बँक सेवा शुल्क म्हणून बँकांना परस्पर देय होईल.
बँकेकडून अधिसूचित फळ पिकासाठी पीककर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकर्‍यांचा फळ पिकांचा विमा प्रसताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत द्राक्ष फळासाठी 15 ऑक्टोबर, डाळिंब, पेरू, मोसंबी, केळीसाठी 31 ऑक्टोबर, लिंबू 14 नोव्हेंबर, संत्रासाठी 30 नोव्हेंबर,
आंबा 31 डिसेंबर अंतिम मुदत आहे. या शेतकर्‍याच्या क्षेत्रांचा विमा मुदतीत करून घेणे बँकांना अनिवार्य करण्यात आले आहे. विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व प्रमाणके तसेच विमा संरक्षण कालावधी व नुकसान भरपाईची रक्कम (प्रती हेक्टरी रूपये) याची सविस्तर माहिती परिपत्रकात देण्यात आलेली आहे.
ही योजना राबविण्यासाठी तालुके व महसूल मंडळनिहाय पिकांची यादी पुढील प्रमाणेः  द्राक्ष- नगर- नागापूर. श्रीगोंदा-बेलवंडी, चिंभळा. संगमनेर-संगमनेर बुद्रुक, घारगाव, संगमनेर, धांदरफळ बुद्रुक. कोपरगाव-रवंदे, सुरेगाव, कोपरगाव, दहेगाव बोलका, पोहेगाव. राहाता- राहाता, लोणी, बाभळेश्‍वर, पुणतांबा, शिर्डी. श्रीरामपूर- उंदीरगाव.कर्जत- कर्जत राशीन, भांबोरा. राहुरी-ताहराबाद. मोसंबी- शेवगाव- चापडगाव, पाथर्डी- करंजी, पाथर्डी, टाकळीमानूर, मिरी. श्रीगोंदा-बेलवंडी, देवदैठण, चिंभळा, कोळगाव. डाळिंब- नगर -सावेडी, कोपरवाडी, भिंगार, नागापूर, चिंचोडी पाटील, वाळकी, रूईछत्तीसी. पारनेर- पारनेर, भाळवणी, वाडेगव्हाण, वडजीरे, निघोज, टाकळी ढोकेश्‍वर, पळशी. श्रीगोंदा- श्रीगोंदा, मांडवगण, बेलवंडी, पेडगाव, चिंभळा, देवदैठण, कोळगाव, काष्टी. कर्जत- कर्जत, राशीन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव,माही. जामखेड- अरणगाव, खर्डा. शेवगाव- शेवगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव. पाथर्डी- पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळीमानूर,करंजी, मिरी. पेरू- नगर -जेऊर, पाथर्डी- करंजी, कोपरगाव- रवंदे, कोपरगाव, दहेगाव बोेलका, सुरेगाव, पोहेगाव. राहाता- राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्‍वर, पुणतांबा, श्रीरामपूर- श्रीरामपूर, बोेलापूर बुद्रुक, उंदीरगाव, बेलापूर, टाकळीभान. राहुरी- देवळाली, टाकळीमिया.कर्जत- कर्जत राशीन, भांबोरा. संत्रा- नगर -कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी, वाकळी, चास, रूईछत्तीशी. राहुरी- वांबोरी. पारनेर- वाडेगव्हाण, निघोज. श्रीगोंदा-बेलवंडी, चिंभळा, देवदैठण, कोळगाव. कर्जत-मिरजगाव. नेवासा- चांदा, घोडेगाव. पाथर्डी- करंजी, भोसे, सातवड, पाथर्डी, माणिकदौंडी. आंबा- नगर -कापूरवाडी, वाळकी. पारनेर- पारनेर, भाळवणी, वाडेगव्हाण, सुपा, टाकळीढोकेश्‍वर, पळशी. श्रीगोंदा- बेलवंडी, श्रीगोंदा. जामखेड- जामखेड, अरणगाव, नान्नज. शेवगाव- बोधेगाव, चापडगाव. पाथर्डी- पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळीमानूर, कोरडगाव, करंजी, मिरी. नेवासा- नेवासा बुद्रुक, नेवासा खुर्द, सलाबतपूर, चांदा. श्रीरामपूर- श्रीरामपूर, टाकळीभान, बेलापूर, उंदीरगाव. कोपरगाव-रवंदे, कोपरगाव, दहेगाव बोलका, सुरेगाव, पोहेगाव. कर्जत- कर्जत, राशीन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, माही. राहुरी- वांबोरी, देवळाली, सात्रळ, ताहाराबाद, राहुरी.

नुकसान भरपाई विमा कंपनी परस्पर बँकेद्वारे अदा करणार
पीककर्ज मर्यादा मंजूर असलेल्यांना योजना सक्तीची
कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारेही पात्र
कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारेही पात्र
द्राक्षसाठी 15 ऑक्टोबर, डाळिंब, पेरूसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत

LEAVE A REPLY

*