पीक विम्यासाठी शेतकरी रस्त्यावर

0
कुकाणा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सुकळी व परिसरातील शेतकरी पीक विमा भरण्यासाठी 1 ऑगस्टपासून कुकाणा येथील सेतू केंद्रावर सकाळपासून येऊन बसत होते. मात्र शेतकर्‍यांना सलग तीन दवस दिवसभर थांबून देखील रात्री उशिरा पीक विमा न भरताच माघारी जावे लागत असल्याने व सेतूचालकाच्या उद्धटपणामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी कुकाण्यात रास्ता रोको आंदोलन केले.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता शेतकर्‍यांना सेतू केंद्र चालक सेतू बंद करून निघाल्यावर शेतकर्‍यांनी चालकास विचारल्यावर आम्ही भरू शकत नाही साईट बंद आहे तुम्हाला कुठे भारायचा तिकडे भरा आम्ही नाही भरू शकत असे उद्धट उत्तर दिल्याने शेतकरी किशोर साबळे यांनी नेवासा तहसीलदार पाटील व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना सांगितले. मात्र सेतू चालकाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी 11 वाजता कुकाणा बसस्थानक येथे तब्बल एक तास रास्तारोको आंदोलन केले. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी तहसीलदारांशी याबाबत फोनवर चर्चा केली असता तहसीलदारांनी आश्‍वासन देऊन कुकाणा येथील सेतू चालकाला पीक विमा घेण्यास सांगितले.
यावेळी लहूजी सेनेचे अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, बबनराव पिसोटे, माजी पंचयात समिती सदस्य शंकरराव भारस्कर, मच्छिंद्र साबळे, किशोर साबळे, सचिन साबळे, लहू गुंड, दिलीप गुंड, संजय बर्डे, भावराव गुंड, खंडू पाटील, महादेव साबळे, नानासाहेब गुंड, रखमाजी लिपणे, गणेश गुंड आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांनी निवेदनावर पीक सेतू मध्ये पीक विमा न घेता बँकेत भरून घेण्यात यावा या मागणीचे निवेदन दिले. यावेळी पोलीस कर्मचारी गायकवाड बुचकूल व कर्मचारी यांना दिलेे. कुकाणा पोलिसांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करून दिली.

या रास्तारोकोच्या वेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारने आता पर्यंत शेतकर्‍यांना फक्त गोड बोलून आश्‍वासनच दिले आहे. पाऊस नसल्याने शेतकरी पीक विमा भरत आहेत. मात्र अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून अनेककांडे विमा भरायला पैसे नव्हते. तरीही कर्ज काढून शेतकरी सेतू मध्ये पीक विमा भरण्यासाठी आले मात्र त्यांना त्या ठिकाणी देखील संघर्षच करावा लागला आहे. त्यामुळे भाजप सरकारचे करायचे तरी काय खाली डोके वर पाय अशी घोषणाबाजी भेरवनाथ भारस्कर यांनी करत सरकारची खिल्ली उडवली.  

आंदोलनासंबंधी कळवून सुद्धा या रस्ता रोकोला तहसीलचे कोणीच कर्मचारी निवेदन घेण्यासाठी आला नसल्याने शेतकर्‍यांमधून तहसील विषयी नाराजीचा सूर निघत आहे.

 

LEAVE A REPLY

*