Photos : झी मराठी अवॉर्डमधील विजेते!; शीतली-अज्या ठरले सर्वोत्कृष्ट जोडी

0
झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा नुकतच अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये 10 पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही 7 पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला.
प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणा-या या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले. राज्यातील 22 शहरांमधून झालेल्या या मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदान, फेसबुकद्वारे मतदान, वेबसाईटवरुन मतदान आणि मिस्ड् कॉलद्वारे मतदान असे पर्याय ठेवण्यात आले.
या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांनी 12 लाखांच्यावर मतांचा पाऊस पाडत भरभरून प्रतिसाद दिला.
हा सोहळा येत्या रविवारी, 15 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वा. झी मराठी आणि झी मराठी एच डी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.
‘लागिर…’ने पटकावले 10 पुरस्कार, शीतली-अज्या ठरले सर्वोत्कृष्ट जोडी
‘लागिरं झालं जी’या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावित या सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली.
‘तुझ्यात जीव रंगला’च्या नावी 7 पुरस्कार, राणा ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळवत सोहळ्यावर आपली छाप सोडली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारांसाठीही या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगली. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.

LEAVE A REPLY

*