PHOTOS : ‘थॉन्ग जीन्स’वर भडकले बॉलिवूड कलाकार!

0

सध्या फॅशन जगतात थॉन्ग जीन्स चर्चेत आहे. अलीकडे टोकियोमध्ये थॉन्ग जीन्स लॉन्च करण्यात आली.

जपानी कंपनी थिबॉटने ही जीन्स डिझाईन केली आहे. हे डिझाईन थिबॉटच्या 2018 समर कलेक्शनचा भाग आहे. पण लॉन्च झाल्यापासून ही जीन्स सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

केवळ इतकेच नाही तर या जीन्सच्या या डिझाईनवर काही बॉलिवूड कलाकारांनी तीव्र शब्दात आपले मत मांडले आहे.

अभिनेत्री बिपाशा म्हणाली, फॅशनच्या नावाखाली जीन्सच्या अशा ‘चिंध्या’ करण्याचा प्रकार मला जराही रूचला नाही. बिपाशाने थॉन्ग जीन्स घातलेल्या मॉडेलचा फोटो पोस्ट करत याबद्दलचा संताप इन्स्टाग्रामवर बोलून दाखवला.

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही फॅशनच्या नावावर सुरु असलेल्या असल्या प्रकाराची खिल्ली उडवली आहे.

एका फॅशन स्टोर्समधील ब्रॅन्डेड टॉप व जीन्सचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे आणि त्याखाली ‘ दोनवर एक भिकेचे कटोरे मोफत’, असे कॅप्शन दिले आहे.

LEAVE A REPLY

*