Photos : पाथर्डी : माजी आमदार राजीव राजळे अनंतात विलीन

0

अहमदनगर (पाथर्डी) :  पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे ग्लोबल हॉस्पीटल, मुंबई येथे शनिवारी रात्री दुःख निधन झाले.

राजळे यांच्यावर कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात 3.30 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पाथर्डी शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज पाथर्डी शेवगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे आ. सुधीर तांबे, जि. प. सदस्या हर्षदा काकडे, कामगार नेते नितीन पवार, तारकेश्वर गडाचे महंत आदीनाथ महाराज शास्री, अशोक महाराज कर्डिले, वैभव पिचड, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, राजेंद्र नागवडे, रिपाइंचे अशोक गायकवाड, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाप्पूसाहेब भोसले, अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, शिवाजी गाडे, नगरसेवक योगीराज गाडे, बबनराव पाचपुते, दादापाटील शेळके आदींनी श्रद्धांजली वाहिली़.

LIVE UPADTE: 

राजळे यांच्यावर कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात 3.30 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुजय विखे यांची उपस्थिती 

खा. दिलीप गांधी यांचे महाविद्यालयात आगमन

विधानसभा अध्यक्ष हरिभाउ बगाडे यांनी राजळे यांचे अंत्यदर्शन घेतले

पंकजाताई मुंडे , राम शिंदे, बाळासाहेब थोरात यांनी अंत्यदर्शन घेतले.

मुंडे, माजी महसूलमंत्री व आ. बाळासाहेब थोरात उपस्थित, पावसाची रिमजिम सुरु 

अंत्ययात्रा दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचली.

जलसंधारण व जिल्हयाचे पालकमंत्री राम शिंदे अंत्यसंस्कारस्थळी दाखल 

अंत्ययात्रा वृद्धेश्वर कारखाना येथे पोहोचली

LEAVE A REPLY

*