PHOTOS : जाणून घ्या महात्मा गांधीजींच्या ‘पणती’विषयी काही खास मीहिती!

0
जगभरात प्रसिद्ध असलेले मोहनदास करमचंद गांधी उर्फ बापू यांच्या आठवणी अजुनही जिवंत आहेत. महामाना नेल्सन मंडेलांसह कित्येक जागतिक नेत्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत संघर्ष केला. अशा महात्म्याचे 154 वंशज 6 वेग-वेगळ्या देशांमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यापैकीच एक महात्मा गांधींचे थोरले पुत्र हरिलाल यांचा मुलगा कांतीलाल यांचाही समावेश आहे. हीरालाल गांधी यांचे पुत्र कांतीलाल आजोबा गांधीजींचे अनुयायी होते.
12 मार्च 1930 रोजी गांधींनी अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढली. त्यावेळी गांधींसह त्यांचे नातू कांतीलाल सुद्धा सहभागी झाले होते.
  • अमेरिकेत राहतात कांतिलाल गांधी यांचे कुटुंब : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कांतीलाल आपल्या समस्त कुटुंबियांसह अमेरिकेत स्थायिक झाले. मेधा गांधी त्यांचीच मुलगी आहे. मेधा गांधी आपल्या परिवारासह अमेरिकेत राहत आहेत. त्या कॉमेडी स्क्रिप्ट रायटर, पॅरोडी प्रोड्युसर आणि वॉइस आर्टिस्ट म्हणून ओळखल्या जातात. मेधा अमेरिकेच्या ओहियो प्रांतातील प्रसिद्ध ‘Dave And Show’ च्या प्रोड्युसर होत्या. सध्या त्या ‘Matty In The Morning Show’ च्या प्रोड्युसर आहेत. इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या फोटोजला हजारो लाइक आहेत. अमेरिकेत ग्लॅमरस आयुष्य जगतानाही त्या गांधींचे विचार आणि आदर्श विसरलेल्या नाहीत. प्रॉडक्शनसह त्या अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवतात.

LEAVE A REPLY

*