Photogallery : सायंकाळी पाच वाजता दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक, ता. २८ : सायंकाळी पाच पर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले होते.

होळकर पुलाखालून १३ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाढविल्यामुळे पुराच्या पाण्यात हळूहळू वाढ होत आहे.

प्रशासनातर्फे काठावरच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीकाठच्या व्यावसायिकांनी आपल्या टपऱ्या व दुकाने सुरक्षिततेसाठी सराफ बाजारात आणून ठेवल्या आहेत.

आज दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठेत अनुत्साह जाणवला. दुपारी पूर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही घटलेली दिसली.

पुराच्या पाण्याचा जोर असाच राहिला तर रामसेतू पुल बुडण्याची शक्यता आहे.

गोरेराम लेन व परिसरात सततच्या पावसामुळे पाणी वाहत असून अनेक कुटुंबियांना त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नारोशंकर मंदिराच्या पायऱ्या आणि सांडव्यावरच्या देवीचा परिसर पाण्यात बुडाला आहे.

LEAVE A REPLY

*