फोटोगॅलरी : सायन्स एक्सप्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नाशिकरोड : ज्ञानाचा खजिना असलेली सायन्स एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झाली आहे. या गाडीतील माहितीपूर्ण प्रदर्शन बघण्यासाठी बालगोपालांनी गर्दी केली होती.

यंदा पर्यावरण संकल्पना घेऊन येथील फ्लॅटफार्म क्रमांक चारवर हे प्रदर्शन विनामूल्य सुरू झाले आहे. जागतिक तापमान कशी रोखावी, पर्यावरणाचे रक्षण कसे करावे याची माहिती यातून देण्यात येत आहे. तेरा डब्यांच्या या सायन्स एक्स्प्रेसमध्ये प्रत्येक डब्यात दोन तज्ज्ञांकडून माहिती दिली जात आहे. तर संरक्षणासाठी रेल्वेचे व आरपीएफचे प्रत्येकी 20 जवान तैनात करण्यात आले आहेत.

लहान मुलांमध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी प्रदर्शनात सोप्या भाषेतील डिजिटल मॉडेल असून मुलांमध्ये गणित व विज्ञानविषयक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून वैज्ञानिक खेळही आहेत. दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना विज्ञानाच्या जादू तसेच वैज्ञानिक प्रयोग, खेळ व कोडी सोडवून घेतली जातात. यात इयत्ता सहावी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करण्यास संधी दिली जात आहे.

मुलांसाठी गणित, विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, जलवायू परिवर्तन, जैव तंत्रज्ञान आदींचे मॉडेल्स असून शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. तर प्लॅटफार्मवर खेळ, प्रश्नोत्तराच्या स्पर्धा होत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*