Photogallery : शेवगावात मुसळधार पाऊस

0

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी ) – मागील दोन महिन्यांपासुन संपुर्ण सृष्टीला ताणलेल्या मेघराजाने श्रावण महिन्याच्या शेवटाला काल सायंकाळपासुन छप्पर फाडके हजेरी लावल्याने तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे तर कोलमडुना पडलेला बळीराजा सुखावला आहे.

काल पासुन तब्बल वीस तास सलग पावसाने संततधार हजेरी लावत अवघ्या धरणीची तृष्णा तृप्त केली आहे.

तालुक्यातील शेती, तलाव, बंधाऱ्यात पाणी साचले असुन शेतांचे बांध फुटले आहेत तर नद्यां – ओढ्यांची पात्रे काही वर्षानंतर भरभरुन वाहु लागली आहेत.

पावसाच्या या किमयेने सर्व सजीव सृष्टीचे चेहरे तरारलेले – फुलले आहेत.

LEAVE A REPLY

*