Photo Gallery : हवाहवासा लडाख…

0

लडाखला जगातील दुसर्‍या क्रमांकाचा थंड प्रदेश म्हणून ओळखले जाते. लडाख हा जम्मू आणि काश्मीर या भारतातील राज्याचा एक विभाग आहे. याचे मुख्यालय लेह या गावी आहे.

लेहचा विमानतळ हा जगातील समुद्रसपाटीपासून सर्वात उंच ठिकाणी असलेला विमानतळ असून या विमानतळाचे नाव कुशोक बकुला रिम्पोचे असे आहे.

लदाखमध्ये खर्दुगला, तंग्लंग ला, चांग ला अशा अत्युच्च खिंडी आहेत. खर्दुगला हा जगातला सर्वात अधिक उंचीवरचा वाहतूक मार्ग आहे.

दुसरे म्हणजे येथे बांधण्यात आलेला ‘बेली बिज’ हा जगातील सर्वात इंचीवर बांधण्यात आलेला हा पूल आहे. हा समुद्रसपाटीपासून ५,६०२ मीटर (१८,३७९ फूट) इतक्या उंचीवर बांधण्यात आलेला आहे. त्याची लांबी ३० मीटर आहे. हा पूल भारतीय लष्कराने १९८२ साली उभारण्यात आला आहे.

नाशिकचे छायाचित्रकार प्रवीण दौंड यांनी नुकतीच लडाखला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात लडाखमधील काही विलक्षण क्षण टिपले आहेत.

LEAVE A REPLY

*