Photogallery : गोवा : नागा चैतन्य-समंथाचा विवाह संपन्न

0
नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रूथ शुक्रवारी रात्री (6 ऑक्टोबर) लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांचे लग्न गोव्यातील हॉटेल ‘W’ मध्ये झाले. नागार्जुनने लग्नाचे फोटो ट्विटरवर शेयर करत याबाबत माहिती दिली. मेंदी सेरेमनी दुपारी 3 वाजता सुरू झाली होती. तर हिंदु पद्धतीने रात्री 11.30 वाजता लग्न झाले. समांथाने यावेळी नागा चैतन्यच्या आजीची साडी परिधान केली होती.

 

या विवाहसोहळ्याला डग्गुबती कुटुंब, व्यंकटेश, सुरेश बाबू यांनीही उपस्थिती लावली. तर इतर सेलिब्रिटी पाहुण्यांमध्ये अभिनेता राहुल रविंद्रन, वेन्नेला किशोर, सुशांत आणि अदिवी सेश यांचा समावेश आहे.

हिंदू विवाहपद्धतीनुसार शुक्रवारी लग्न झाल्यानंतर हे जोडपे शनिवारी ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न करतील. तर रविवारी हैदराबाद येथे या नवदाम्पत्याच्या आलिशान रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलेय.

समांथा फॉर्मल सेरेमनीमध्ये डिझायनर क्रेशा बजाजने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करेल. परतल्यानंतर समांथा शिवकार्तिकेयनच्या अनटायटल्ड चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार आहे. समांथा याचवर्षी ‘राजू गरी गढी 2’ मध्येही झळकणार आहे. यात ती सासरा नागार्जुनबरोबर काम करत आहेत. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

LEAVE A REPLY

*