PHOTOS : राजळे, जगतापांच्या स्मृतींनी सभागृह गहिवरले

0

सर्व पक्षीय श्रध्दांजली, यशवंतराव गडाखांकडून तरूण राजकारण्यांना मोलाचा सल्ला

अहमदनगर(प्रतिनिधी) – पाथर्डी येथील माजी आमदार राजीव राजळे व श्रीगोंदाचे जेष्ठ नेते कुडंलीराव जगताप यांची नगर येथील सहकार सभागृहात सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा व शहरातील सर्वक्षेत्रातील नामंवत व्यक्ती उपस्थितीत होत्या. यावेळी तरूण नेते राजळे, यांच्या अकालीन निधनाबद्दल सर्वांनी हळहळ व्यक्त केली. तसेच जगतापाचे कार्य देखील श्रीगोंदा मध्ये मोठे असल्याचे सांगितले. राजळे, जगताप यांच्या स्मृतीनी सहकार सभागृह गहिवारला.
नगर शहरातील राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, शिवाजीराव नागवडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवाजीराव कर्डीले, भाऊसाहेब कांबळे, जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मंदार भारदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तविक सत्यजित तांबे यांनी केले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी राजळे व जगतापाच्या स्मृतीना उजाळात दिला. एक कृत्वावान राजकारणी, कला, क्रीडा, साहित्य, संगीत, यांची आवड असणारा एक तरूण नेतृत्व अकाली हारपलाचे व्यक्त केले. त्याच्या अकालीन निधानामुळे जिल्ह्याच्या राजकारण्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे उपस्थितींना सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते गडाख म्हणाले की, शिकलेल्या तरूणांनी राजकरण्यात आले पाहिजे, असे नेते सांगतात. प्रत्येक्षात राजकारण्यात आलेल्या तरूणानांचा अनुभव हा वेगळा असतो. जिल्हयातील जुण्या राजकारण्यांच्या पिढीमध्ये सवांद होतात. मात्र तो आताच्या पिढीमध्ये होत नाही. आजच्या तरूण राजकार्‍यांनी एकमेकांत सवांद ठेवत नवीन प्रथा सुरू केली पाहिजे. राजकारण्यात कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला समाजाला दिशा देण्याचे काम करावे लागेल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*