Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedWorld Sparrow Day : चिऊताई हरवली कुठे ?

World Sparrow Day : चिऊताई हरवली कुठे ?

चिव चिव असा गलका कानावर आला की समजायचे जवळच कोठे तरी चिमण्यांची शाळा (Sparrow) भरली आहे. बालपणात एक घास चिऊचा म्हणत चिऊताईशी असलेले नाते आल कालपरत्वे बदलत चालले आहे.

वाढत्या शहरांच्या (City) विकासामुळे आज चिमणी (Sparrow) हा पक्षी नजरेला दिसणे दुरापास्त झाले आहे. अंगणामध्ये वाळवत घातलेल्या धान्यावर (Grain) सगळ्यांच्या नजरा चुकून दाणे चोरणारी चिमणी (Sparrow) शेवटची तुम्ही कधी बघितली ?

- Advertisement -

जन्माला आल्यानंतर मानलेली सर्वात पहिली बहीण… चिऊताई! आपल्या शाळेच्या पुस्तकातली लाडकी चिऊताई हरवली कुठे ? याचा विचार आपल्या डोक्यात येतच नाही ? गेल्या काही वर्षांच्या काळात आपल्या घरात व अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भूर उडून गेली ती ती आज पर्यंत आलीच नाही ….!

जंगल तोडून उभ्या राहिलेल्या काँक्रीटच्या इमारती ती बिचारी चिमणी कुठे राहणार ? हल्ली तिला घर उरलेच कुठे ? हळूहळू आता ती सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे आणि ती संपली तर तुम्हां आम्हांस सुद्धा संपण्यास वेळ लागणार नाही अस समजा !

वाढत्या शहरीकरणामुळे आणि आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांची अनुपलब्धता अन्नाची अनुपलब्धता आणि शहरातले वाढते प्रदूषण, मोबाईल चे टॉवर यामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या कारणामुळे आज आपल्या बालपणी सहज दिसणारी चिमणी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

तिला वाचवण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणून 2009 पासून चिमणी वाचवण्यासाठी मोहीम सुरू झाली. चिमण्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी 20 मार्च 2010 रोजी पहिल्यांदा दिल्ली येथे जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.

चिमणी वाचवण्यासाठी बाभूळ वृक्षाची लागवड करा. कारण यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

चिमणी आणि रान चिमणी अशा दोन प्रकारच्या चिमण्या पूर्ण जगभरात आढळतात. चिमणी हा पक्षी भारतात सगळीकडे आढळतो. यातच शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतातील कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे चिमण्यांची झपाट्याने कमी होत चालली आहे. पशुपक्षी संवर्धनाची समस्या निर्माण झाली आहे! आणि त्यासाठी आपण चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी पर्यावरणपुरक पर्यंत केले पाहिजे !

अहमदनगर जिल्ह्यातील करंजी येथील हजारो चिमण्यांचे जन्मस्थान असलेली मातीची गढी. जी दुर्मिळ होत चालली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या