Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedWorld Photography Day : तुम्हाला पण फोटोग्राफीची आवड आहे?, जाणून घ्या मोबाईल...

World Photography Day : तुम्हाला पण फोटोग्राफीची आवड आहे?, जाणून घ्या मोबाईल फोटोग्राफीसाठी बेस्ट टिप्स

दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन (World Photography Day 2021) म्हणून साजरा केला जातो. छायाचित्राचा आधार घेत आपल्या भावना लोकांसमोर मांडण्याचे काम एक छायाचित्रकार करीत असतो. छायाचित्रकाराच्या कामाला प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी जागतिक छायाचित्र दिन साजरा केला जातो.

दरम्यान हल्लीच्या काळात मोबाईल कॅमेरा वापरणं ही नित्याची बाब झाली आहे. उत्तम कॅमेरा असलेल्या मोबाईल सोबतच तुम्हाला फोटो देखील उत्तम प्रकारे काढता आले तर तुम्ही काढलेला फोटो नक्कीच आकर्षक असेल. म्हणूनच जाणून घेऊयात फोटोग्राफीसाठी बेस्ट टिप्स.

- Advertisement -

फोटोग्राफी मध्ये प्रकाश हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. फोटो काढताना प्रकाश नेहमी गरजेचा असतो प्रकाश कुठून येत आहे हे नेहमी पाहावे लागते. मोबाईल फोटोग्राफी करताना रिफ्लेक्टिव्ह प्रकाशाचा विचार करा. तसेच वस्तूंवर पडणाऱ्या सूर्याच्या सावलीचा विचार करणे सुद्धा फार महत्वाचे आहे. सूर्योदय किंवा सूर्यास्तच्या वेळी सराव करा.

तुम्ही जेव्हा फोटो काढता तेव्हा फ्रेमचे उभे आणि आडवे तीन भाग करून तुमचा subject फ्रेमच्या मध्यभागी ठेवणे याला रुल ऑफ थर्ड असे म्हणतात. त्याचबरोबर मोबाईलवर फोटोग्राफी करताना झुमिंगवर खास लक्ष ठेवा. तुम्हाला एखाद्या वस्तूचा फोटो काढायचा असल्यास मोबाईल कॅमेरा झूम न करता स्वतःला मूव्ह करा. मोबाईल कॅमेरा झूम करून फोटो काढल्यास फोटो क्लिअर येत नाहीत.

मुव्हींग ऑब्जेक्टचा फोटो काढताना मोबाईल स्टेबल राहण्यासाठी ट्रायपॉडचा वापर करू शकता. तसेच मोबाईल फोटोग्राफीच्या उत्तम फोटो मागे मोबाईल मध्ये असलेले विविध ऍप्स हे मुख्य कारण आहे. फोटो काढल्यानंतर एडिट मोडचा वापर करून तुम्ही फोटोला नवीन लुक देऊ शकता.

तुम्ही फोटो कोणत्या अँगल ने काढता यावरून तुमचा फोटो काढण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. तुम्हाला उत्तम अँगलने फोटो काढायचा असेल तर कशी तुम्हाला उंचावरून काढावा लागेल तर कधी जमिनीवरून. अशा प्रकारे तुम्ही अँगलचा विचार करून उत्तम फोटो काढू शकता. खूप सारे फोटो कसेही फोटो काढण्यापेक्षा वेळ घेऊन कमी पण चांगले फोटो क्लिक करा.

कॅमेरा लेन्स स्वच्छ ठेवा. यामुळे फोटो स्वच्छ आणि शार्पर येण्यास मदत होते. फोटो लेन्स स्वच्छ नसल्यास फोटो क्लिअर येत नाहीत. तसेच मोबाईलचा फ्लॅश डिजिटल कॅमेरा इतका चांगला नसला तरी मोबाईल फ्लॅश योग्य प्रकारे वापरून तुम्ही उत्तम फोटो काढू शकता. फ्लॅश आणि विदाऊट फ्लॅशचे फोटो काढून तुम्ही चाचणी करू शकता.

मोबाईलचा कॅमेरा ऑटोमॅटिक ऑब्जेक्ट फोकस करतो परंतु अनेक ऑब्जेक्ट मधील एखादा ऑब्जेक्ट फोकस करण्यासाठी मोबाईल स्क्रीन वर टॅप केल्यास फोटो अधिक क्लिअर येतो. तसेच तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींसोबतचे क्षण अविस्मरणीय करायचे असतील तर कॅन्डीड फोटो हा उत्तम पर्याय आहे. अचानक लक्ष नसताना काढलेले हे फोटो दिसायला नैसर्गिक आणि आकर्षक दिसतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या