Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजागतिक डावखुरा दिवस : अमिताभ, सचिन, मोदीसह जगातील प्रसिद्ध डावखुरे कोण ?

जागतिक डावखुरा दिवस : अमिताभ, सचिन, मोदीसह जगातील प्रसिद्ध डावखुरे कोण ?

उजव्या हाताने काम करणे कधीही सोयीचे असते, असा समज समाजात आहे. हाच समज दूर करण्यासाठी तसेच डावखुऱ्या असणाऱ्या लोकांविषयी जागरुकता आणण्याच्या दृष्टीने १३ ऑगस्ट हा जागतिक डावखुरा दिवस (world left handers day) साजरा केला जातो. हा पहिल्यांदा १९७६ मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. १९९० साली इंग्लंडमध्ये ‘लेफ्ट हॅण्डर्स क्लबची’ स्थापना झाली. तर भारतात संदीप विष्णोई यांनी इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबची स्थापना केली

राष्ट्रपिता महात्मा गांधी, चार्ली चाप्लिन, रतन टाटा, अल्बर्ट आइन्स्टाइन, अमिताभ बच्चन, ज्युलिया रॉबटर््स, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, मर्लिन मन्रो, मेरी कोम, सुरेश रैना, युवराज सिंह, आशा भोसले, बराक ओबामा, बिल गेट्स यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डावखुऱ्या लोकांच्या यादीत समावेश केला जातो.डावखुरे लोकं आपला मार्ग स्वतः निवडणारे असतात. उत्साहावर नियंत्रण ठेवणे जाणतात. जगप्रसिद्ध अॅप्पलच्या मॅकींटॉश कम्प्युटरच्या पाच डिझायनर पैकी चार डावखुरी होती हे विशेष.

- Advertisement -

महात्मा गांधी :

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीही ( mahatma gandhi) डावखुरे होते. देशाला 150 वर्षांच्या ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधींजींचा मोठा वाटा होता, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. सरकारी कार्यालय ते भारतीय नोटांवरील त्यांचा फोटो त्यांची महानता दाखवण्यासाठी पुरेसा आहे.

नरेंद्र मोदी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) डावखुरे आहेत. ते लिहिण्यासाठी उजवा हात वापरतात पण खेळण्यासाठी डावा हाताचा वापर करतात. तसेच अनेक कामे ते डाव्याहाताने करतात.

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan:) यांनी बॉलिवूडचं एक संपूर्ण दशक गाजवलं. त्यांचे सिनेमे लोक आताही तितक्याच आवडीने पाहतात. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी फक्त भारतातील जनतेलाच नाही संपूर्ण जगाला वेड लावलं. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनही (Abhishek Bachchan) डावखुरा आहे.

सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा सुद्धा डावखुरा आहे. पण फलंदाजी करताना तो उजव्या हाताने खेळतो. मात्र, ऑफफिल्ड तो डावखुरा आहे.

रतन टाटा

देशातील प्रसिद्ध उद्योगपती (Ratan Tata) हे डावखुऱ्या व्यक्तींमधील मोठे नाव आहे. टाटा ट्रस्टकडून इंडिनल लेफ्टहँण्डर क्लबला शिष्यवृत्ती दिली जाते.

बराक ओबामा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (barack obama) हे देखील डावखुरे होते. ते अमेरिकेचे एकमेव कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यांच्या साध्या राहणीमानाने त्यांनी सर्वांच्या मनात एक आदरयुक्त स्थान प्राप्त केलं.

मार्क झुकरबर्ग

सोशल मीडियाच्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्म फेसबुकवर लोकांना एकमेकांशी जोडणारे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हे देखील डावखुरे आहेत. आज ते जागातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्कचे बादशाह आहेत.

ही विशेष जाणून घ्या…

  • जगात डावखुऱ्यांची संख्या ही १०% आहे.

  • जर आई-वडील डावखुरे असतील त्यांचे मूलही डावखुरे असण्याची शक्यता ही २६% असते.

  • डावे लोक एथलेटिक्समध्ये इतरांपेक्षा जास्त निपुण असतात.

  • डावखुरे लोक पाण्याखाली इतरांपेक्षा जास्त चांगले पाहू शकतात. त्यांचे डोळे अशा परिस्थितीशी लवकर जुळवून घेतात

- Advertisment -

ताज्या बातम्या