World Bicycle Day : सायकल चळवळीच्या वृद्धीसाठी...

World Bicycle Day : सायकल चळवळीच्या वृद्धीसाठी...

आज 3 जून. जागतिक सायकल दिन. संपूर्ण जगभरातील सायकलप्रेमी हा दिवस साजरा करतात. या चळवळीत नगर जिल्ह्यानेही आपला वाटा उचलला आहे. जिल्ह्यातील सायकलिंगच्या स्थितीचे अवलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न...

एप्रिल 2018 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सर्व देश हा दिवस उत्साहात साजरा करतात. सायकल चालविणे आरोग्याला हितकारक असलेले वाहन. कोरोना काळात सायकलींचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सायकलिंगमुळे फुफ्फुसे व हृदयाला बळकटी येते तसेच पायाचे, गुडघ्याचे सर्व स्नायू बळकट होतात.

नियमित सायकलिंग केल्यामुळे स्थूलपणाची समस्या आपोआप दूर होते. याशिवाय डायटमध्ये सुद्धा काही बदल करावा लागत नाही. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सायकल चालवणे हा देखील एक चांगला उपक्रम आहे. पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्यास ते उपयुक्त आहे. तसेच सायकल चालवताना कोणतेही इंधन खर्च होत नाही.

सध्या स्वयंचलित वाहनांचा जमाना असला तरी आरोग्याच्या दृष्टीने सायकलीचे महत्त्व टिकून आहे. काही वर्षांपूर्वी अपरिहार्यता म्हणून सायकलचा वापर केला जात असे. मात्र, आता अनेकजण हेतूपुरस्सर सायकल वापरतात. सायकल चळवळ विकसित व्हावी यासाठी काही सायकलप्रेमींच्या पुढाकारातून नगरमध्ये सायकलिस्ट ग्रुप तयार झाला.

त्यानंतर गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये त्याची रीतसर नोंदणी होऊन ‘अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन’ची स्थापना झाली व त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटलासुद्धा नोदणी पूर्ण झाली असून असोसिएशन ला दिली जाणारी देणगी, मदत पूर्णतः करमुक्त असणार आहे.

या असोसिएशनचा उद्देश मुख्यतः नगर शहर व जिल्ह्यात सायकलचा प्रसार करणे, जास्तीत जास्त सायकलिस्ट तयार करणे, नवीन नवीन सायकलपटू तयार करणे. 18 ते 71 वयोगटातले 450 वर नोंदणीकृत सदस्य असून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार करण्यासाठी सायकलपटूंना असोसिएशनतर्फे प्रोत्साहन दिले जाते. गुणवत्ताप्राप्त खेळाडूंचा सन्मान केला जातो. तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला जातो.

सायकलचा प्रसार करण्यासाठी विविध राईड असोसिएशनतर्फे आयोजित केल्या जातात. उदा. 1 जानेवारी - संकल्प राईड, महाशिवरात्र राईड, 19 फेब्रुवारी - शिवनेरी राईड, 8 मार्च महिला दिनानिमित्त - राईड विथ हर फॉर हर, आळंदी राईड, सायकल दिन, पर्यावरण दिन अशा विविध प्रसंगानुरूप विविध ठिकाणी राईड आयोजित केल्या जातात. गेल्या चार वर्षांपासून सुरू केलेल्या पंढरपूर राईडला मोठा प्रतिसाद मिळतो. गेल्या वेळी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी राईडसाठी नगरमधून 63 सायकलिस्ट गेले होते.

सायकल चळवळ वाढावी यासाठी स्थापन झालेला हा ग्रूप स्वआरोग्य जपत रोटरी क्लबच्या सहकार्याने पोलिओ, टी.बी. या रोगांबद्दल जनजागृतीसाठी राईड आयोजित करून सामाजिक कार्यास हातभार लावत आहे. याच बरोबर या वर्षी पंढरपूर सायकल दिंडी दरम्यान वृक्षारोपणाने आयोजन केले जाते.

शहरी भागाबरोबरच जिल्ह्यातील तालुक्यातील लोकांना आम्ही राईडमध्ये सहभागी करून घेतो. आज शेवगाव, राहुरी, पाथर्डी, नेवासा, जामखेड येथे नगरच्या धर्तीवर सायकलिंग ग्रुप, क्लब तयार झाले आहेत. शेवगाव ग्रुपचा तर विशेष उल्लेख करावा लागेल. कारण त्यांनी नियमित राईड करून त्यांची संख्या 50च्या वर वाढवली आहे. सर्व 50 जण पंढरपूर राईडमध्ये सामील होत आहेत. जामखेड, शेवगाव व राहुरी ग्रुपनेसुद्धा स्वतंत्ररित्या डजण राईड पूर्ण केल्या आहेत.

अहदनगर सायकलस्ट असोसिएशन इठच् या स्वावलंबी राईडसाठी प्रोत्साहन देतो. डजण राईडमुळे लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढला की, ते आता 200, 300, 400, 600 किलोमीटरच्या राईडला सहज तयार होतात. नाहीतर दोन वर्षापूर्वी नगरमधून केवळ 1-2 जणच तयार होत होते. आता डठ (र्डीशिी ठरपवेपशरी) किताब मिळवलेले 5-6 जण आहेत. तो आकडा लवकरच 20-22 पर्यंत जाईल.

या सर्व आयोजनात कमिटीचा खूप मोठा सहभाग आहे. यात चंद्रशेखर मुळे (अध्यक्ष), नितीन पाठक (उपाध्यक्ष), अमोल कुलकर्णी (सचिव), सीए प्रसाद भंडारी, मनोज एनगदूल (हॉबी टेलर्स), नागेश धसाळ, योगेश खरपुडे, केतन बलदोटा (खजिनदार), आशिष तत्तू, सुवर्णा मुळे व वैष्णवी पाठक असा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे.

चंद्रशेखर मुळे (अध्यक्ष, अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com