Friday, April 26, 2024
HomeUncategorizedका साजरा केला जातो लष्कर दिन

का साजरा केला जातो लष्कर दिन

भारतीय लष्करातर्फे आज ७३ वा लष्कर दिवस साजरा केला जात आहे. देशात दरवर्षी १५ जानेवारीला लष्कर दिन किंवा सेना दिन म्हणून साजरा केला जातो. फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी १९४९ मध्ये भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. त्यामुळे हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो.

ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल फ्रान्सिस बचर हे ब्रिटिश भारताचे शेवटचे लष्कर प्रमुख होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही काही काळ त्यांनीच भारतीय लष्कराचे प्रतिनिधीत्व केले.

- Advertisement -

भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर म्हणून ओळखले जात असे.

भारतीय लष्कराची स्थापना १ एप्रिल १८९५ रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत.

जसा आर्मी डे १५ जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे ‘नेव्ही डे’ हा ४ डिसेंबरला तर ‘एअर फोर्स डे’ ८ ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय ७ डिसेंबर रोजी ‘आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे’ साजरा करण्यात येतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या