जाणून घ्या NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार 'द्रौपदी मुर्मू' यांच्याबद्दल

जाणून घ्या NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार 'द्रौपदी मुर्मू' यांच्याबद्दल

मुंबई | Mumbai

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी काल आपापले उमेदवार जाहीर केले.

भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राष्ट्रपतीपदासाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा काल केली; तर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील.

द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्यातील आहेत. झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओडिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या.

मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या.

भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ त २०१५ मध्ये काम केलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com