करोनामुळे वाघ कॉलेज - जत्रा उड्डाण पुलाचा मुहुर्त लांबणीवर

अजुन १० महिन्याचा अवधी
करोनामुळे वाघ कॉलेज - जत्रा उड्डाण पुलाचा मुहुर्त लांबणीवर
उड्डाण पूल digi
Updated on
2 mins read

नाशिक । Nashik

राज्यातील कॉग्रेस आघाडीच्या कारकिर्दीत झालेल्या गरवारे ते मीनाताई ठाकरे स्टेडीयम पर्यतच्या उड्डाणपुलाच्या काही अंतरानंतर के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज ते हॉटेल जत्रा पर्यत नवीन होत असलेल्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त करोनामुळे आता लांबणीवर पडला आहे. करोनामुळे मार्च ते जुन या काळात काम बंद झाल्याने ठेकेदार कंपनीला मुदतवाढ मिळाली असुन आता हे काम आता येत्या मे २०२१ पर्यत पुर्ण होणार आहे. तरीही आता या कामास ठेकेदार कंपनीकडुन वेग देण्यात आला आहे. (सर्व फोटो : सतीश देवगिरे )

के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज याठिकाणी हा उड्डाणपुल उतरल्यानंतर याठिकाणाहून ते आडगांव मेडीकल कॉलेज या दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका घडत जाऊन सुमारे सव्वाशेच्या आसपास नागरिकांचा अपघातात बळी गेले.

भुपृष्ट वाहतुक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी  के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज ते हॉटेल जत्रा पर्यत या नवीन उड्डाण पुलास मंजुरी देत याचे भूमिपुजन केले आहे. या पुलाच्या कामास दोन वर्षापुर्वी प्रारंभ झाल्यानंतर मोठ्या वेगात हे काम सुरू झाले असतांना मार्च महिन्यात करोनामुळे या कामाला ब्रेक लावला.

मार्च महिन्यात करोनामुळे लागु झालेल्या लॉकडाऊन मुळे कामगार व अधिकारी गावी गेले. परिणामी लॉकडाऊनच्या तीन टप्प्यापर्यत उड्डाणपुलाचे काम थांबले गेले. जुन महिन्यात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या कामाने गती घेतली आहे.

आत्तापर्यत पुलांसाठी लागणारे ६९ खांब तयार होऊन यावर पुलांचे तयार साचे बसविण्याचे काम जवळपासुन ८०  टक्के पुर्ण झाले आहे. तसेच पुलाला चढण्याचा व उतरण्यासाठीचा रस्त्यासाठी लागणारे खांब तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच हा पुल कोणार्कनगरसमोर उतरणार आहे.

आता हॉटेल जत्रापासुन कोणार्कनगर पर्यत रस्ता खोदकाम सुरू असुन याठिकाणी उताराची भित्त उभारणीचे काम सुरू आहे. करोनामुळे जवळपास तीन ते चार महिने वाया गेल्यानंतर आता या कामास वेग देण्यात आला आहे.

परिणामी या कामाची मुदत वाढुन देण्यात आल्याने आता या उड्डाणपुलाचे काम येत्या मे २०२१  मध्ये पुर्ण होणार आहे. या कामाचे उद्घाटनास भुपृष्ट वाहतुक व जहाज मंत्री नितीन गडकरी येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com