धुळे । प्रतिनिधी

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण दहा मतदान केंद्रांवर दुपारी बारा वाजेपर्यंत 302 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली.

या मतदार केंद्रात भाजपतर्फे अमरीशभाई पटेल आणि कॉंग्रेसच्या वतीने अभिषेक मोतीलाल पाटील हे उमेदवारी करीत आहेत.

दोन्ही जिल्ह्यातील दहा केंद्रांवर आज सकाळीपासून 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे.

शिरपूरमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत 48 पैकी 41 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला