Photo वीर जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव – Jalgaon

‘वीर जवान अमित पाटील अमर रहे’ च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियन मध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या मूळगावी वाकडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळी नऊ वाजता अमित यांचे पार्थिव घरी आणण्यात आले.

फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रेस सुरुवात झाली.

बुधवार, 16 डिसेंबर 2020 रोजी जम्मूमधील पूंछ भागात अमित पाटील यांना वीरगती प्राप्त झाली.

अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरूण पुढे चालत होते.

कुटूंबिय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

वीर जवान यांच्यामागे वडील साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशाली, एक मुलगा, एक मुलगी, एक बहिण, एक भाऊ असा परिवार आहे.

सुरुवातीस वीर जवान अमित पाटील यांच्या पार्थिवास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले.

त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वाकडी येथे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी अनेक मान्यवर व्यक्ती, संस्थाच्यावतीने वीर जवान अमित यांना श्रध्दांजली अर्पण केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *