वसुबारस पुजनाने प्रकाश पर्वास प्रारंभ; बळीराजाकडुन कामधेनूची कृृतज्ञता

वसुबारस पुजनाने प्रकाश पर्वास प्रारंभ; बळीराजाकडुन कामधेनूची कृृतज्ञता

नाशिक | सुधाकर शिंदे

आंधारातून प्रकाशाकडे जातांना नवा उत्साह, चैतन्य व आनंद घेऊन येणारा सण दिवाळी. लक्ष लक्ष दिपांनी वातावरण तजोमय बनवून प्रकाश पर्वाची प्रारंभ हा वसुबारस अर्थान गाय - वासरु पुजनाने केला जात असल्याने आज सर्वत्र बळीराजासह सर्वांनीच गाय - वासराचे पुजन करीत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली...

दिपावली सणाची आरंभ आजच्या आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस वसु बारस सणाने केला जातो. हिंदू धर्मात गाईला महत्वपुर्ण स्थान असल्याने या दिवशी गाई व तिच्या वासरीचे संध्याकाळी पूजा केले जाते. या प्रकाशांच्या सणात घर - घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या सणानिमित्त सर्वत्र दिवाळीस सुरूवात झाली. बळीराजाने सायंकाळी गाय - वासरीचे पुजन करीत त्यांना त्यांच्या आवडीचे नैवद्य खाऊ घालण्यात आले.

आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्‍या या प्राण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून महिलांकडुन वसु बारस पुजन करण्यात आले.

तसेच शहरात व ग्रामीण भागात असलेल्या गो शाळेत जाऊन महिलांनी गो पुजन करीत हा सण साजरा केला. यानंतर उद्या (दि.१३) रोजी धनत्रयोदशी सण असल्याने यादिवशी आरोग्याची देवता धनन्वंतरी पुजनाची तयारी करण्यात येत आहे.

आजच्या वसुबारसाच्या पुजनाने खर्‍या अर्थाने दिवाळी सणाचा प्रारंभ होत असुन यानंतर पाठोपाठ असे धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण साजरे केले जातात. यंदा लक्ष्मीपुजन (दि.१४) शनिवारी आले असुन रविवार (दि.१५) हा भाकड दिवस आला आहे. यामुळे यंदा भाऊबीज व पाडवा एकाच दिवशी आल्या आहे.

Title Name

सर्व छायाचित्रे : सतिश देवगिरे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com