देशभरात मुलांच्या लसीकरणासाठी वाढता प्रतिसाद, पाहा PHOTOS

देशभरात मुलांच्या लसीकरणासाठी वाढता प्रतिसाद, पाहा PHOTOS

करोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा देशात वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला होता.

आज १ जानेवारीपासून लस नोंदणी सुरू झालेली असून, लसीकरण आजपासून सुरू झाली आहे.

मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येत आहे.

मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात झालेली आहे.

या लहान मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

त्याचबरोबर प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना लस घेण्यासाठी पात्र असल्याचंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

लस घेण्यासाठी शाळेचं किंवा आधार ओळखपत्र असणं आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.