Photo ओळख पटविण्यासाठी शरीराच्या या अवयवांची होते मदत

Photo ओळख पटविण्यासाठी शरीराच्या या अवयवांची होते मदत

शरीराचे अवयव - Body parts

एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याठिकाणी गुन्हेगाराने गुन्हा करताना कोणताही माग मागे सोडलेला नसेल तरी त्याच्या शरीराच्या या अवयवांपैकी एखाद्या अवयवाचे ठसे त्या ठिकाणी उमटले आहेत का? याचा शोध पोलीस घेत असतात. या अवयवांची माहिती जाणून घेऊ या...

आवाज- आवाज हा मानवी शरीराचा अवयव नाही मात्र प्रत्येक माणसाचा आवाज ही अत्यंत महत्त्वाची ओळख ठरू शकते. त्यामुळेच आपण एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहात नसलो तरी तिच्या आवाजावरून तिला ओळखू शकतो. आता अशा प्रकारची अनेक अॅप्स आली आहेत ज्यात डिव्हाईस अनलॉक करताना आवाजाचा वापर केला जातो.

डोळे - डोळ्यांच्या बाहुल्या किंवा आयरिस याही माणसाची ओळख पटवू शकतात. डोळे हे केवळ पाहण्यासाठी नाहीत तर ते आपली ओळख पटविणार्‍या अवयवांपैकी एक आहे. डीएनए नुसार प्रत्येक माणसाच्या डोळ्याच्या बाहुल्या युनिक असतात. इतकेच नव्हे तर एकाच माणसाच्या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्याही वेगळ्या असू शकतात. यामुळेच आता स्मार्टफोन लॉक करताना आयरिस फिचर त्यात आले आहे. अनेक देशात परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या डोळ्याचे स्कॅनिंग केले जाते, त्याचप्रमाणे आधारकार्ड साठी सुध्दा डोळ्यांचे स्कॅनिंग केले जाते.

बोटांचे ठसे - जगात प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात व यामुळेच बोटांच्या ठशांवरून गुन्हेगाराची ओळख पटविणे सोपे जाते. माणसाची ओळख फक्त बोटांच्या ठशांवरूनच करता येते असे मात्र नाही. आपल्या शरीरातील अनेक अवयवही अशी ओळख पटविण्यास मदत करू शकतात.

कान - प्रत्येक माणसाच्या कानाचा आकार वेगवेगळा असतो. ब्रिटीश संशोधकांनी कानाच्या कर्व्हवरून माणसाची खरी ओळख पटविण्याची शक्यता ९९.६ टक्के असते असे सिद्ध केले आहे.

ओठ - ओठांचे ठसे हेही माणसाची ओळख पटविण्यासाठी पुरेसे ठरतात. एखादा किस आपली ओळख पटविण्यासाठी डिटेक्टीव्हला पुरेसा ठरतो असे म्हणतात.

जीभ - फिंगरप्रिंट इतकेच जीभ हेही माणसाची ओळख पटविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. जीभेचा आकार व टेक्श्चर कधीच बदलत नाही. त्यामुळे जीभेची प्रिंटही ओळख पटविताना महत्त्वाची ठरतात.

दात - दातांच्या सहाय्याने डीएनएची ओळख पटविता येते इतकेच नव्हे तर माणसाच्या अनेक सवयीही माहिती होतात. म्हणजे तुम्ही कांहीही खाताना दातांचा किती दाब देता, एखादे वाद्य वाजविता काय हेही ओळखता येते. दातांची रचना ही सारी माहिती एकत्र करण्यास उपयुक्त ठरते. अगदी आयडेंटिकल ट्वीन्स म्हणजे एकसारख्या जुळ्यांच्या दातांची रचनाही वेगळी असते.

पायाचे अंगठे - बोटांच्या ठशांप्रमाणेच प्रत्येकाचा पायाच्या अंगठ्याचे ठसे वेगळे असतात असे म्हणतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com