Friday, April 26, 2024
HomeUncategorizedया शहरांमध्ये आहेत ‘क्लॉक टावर’

या शहरांमध्ये आहेत ‘क्लॉक टावर’

पुर्वी हातावर घड्याळं नसायची, हातावर तर जाऊ द्या, घरात सुध्दा घड्याळं नसायचे. उगवता सूर्य, माध्यान्न सूर्य आणि मावळता सूर्य बघूनच दिवसाची वेळ समजायची. हळूहळू यंत्र युगाने आपल्या आयुष्याचा ताबा घेतला आणि घड्याळाची गरज भासायला लागली. सुरुवातीला घरातल्या भिंतीवर टोल्याचे घड्याळ असणारे लोक श्रीमंत समजले जायचे. यानंतर ब्रिटिशांनी क्लॉक टॉवरची आयडिया भारतात आणली. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या चौकात घड्याळाचे मनोरे उभे राहिले. यापैकीच ११ महत्वाचे क्लॉक टॉवरबद्दल ही सचित्र माहीती..

राजेंद्र पाटील, जळगाव – Jalgaon

शास्त्री टॉवर, जळगाव

जळगाव शहरातील अतिशय महत्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणजे शास्त्री टॉवर. टॉवरच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घड्याळाचे डायल १२ फूट आहे. घड्याळाचा मोठा काटा ६ फूट लांब आणि लहान काटा ५.५ फूट लांब आहे. घड्याळाची वाइंडिंग चेन ही 72 फूट लांबीची आहे. घड्याळाला ऊर्जा देण्यासाठी २०० किलो वजनाच्या चार तबकड्या आहेत. घड्याळात पितळ्याचे चाक असून दर आठ दिवसांनी घड्याळाला चावी द्यावी लागते. मागील काही वर्षे हे घड्याळ बंद होते, त्याची दुरूस्ती जळगाव येथील जैन उद्दयोग समूहाने केली.

- Advertisement -

राजाबाई टॉवर, मुंबईचे

मुंबईतील एक इमारत आहे. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून ही वास्तू उभारली आहे. हा निधी देताना त्यांनी त्यांची आई राजाबाई यांच्या नावेच ही वास्तू उभारली जावी अशी अट घातली होती. म्हणून ही वास्तू ‘राजाबाई टॉवर’ या नावाने ओळखली जाते. १ मार्च, इ.स. १८६९ रोजी या वास्तूची पायाभरणी झाली आणि नोव्हेंबर इ.स. १८७९ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्या काळी याच्या बांधकामाचा खर्च दोन लाख रुपये झाला होता. राजाबाई टॉवर स्तंभ इमारतीचा वास्तुविशारद सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट हा होता

घड्याळ गोदी

एकेकाळी गोदीत काम करणारे कामगार अडाणी होते त्यामुळे पोर्ट ट्रस्टच्या वेगवेगळ्या गेटला रंगावरून नावे दिली होती. उदाहरणार्थ, ‘यलो गेट’, ब्ल्यू गेट, इत्यादी. गोदीचे मेन गेट मात्र घड्याळ गोदी म्हणून ओळखले जायचे, ते तिथे असलेल्या क्लॉक टॉवरमुळे.

हुसैनाबाद क्लॉक टॉवर, लखनऊ

भारतातल्या सर्वात उंच टॉवर्समध्ये हुसैनाबाद क्लॉक टॉवरची गणना होते. लखनऊमध्ये रुमी दरवाजा इथे हा टॉवर आहे आणि तो १९८१ साली नासीर उद्दीन हैदर या नवाबाने ‘अवध’चे पहिले लेफ्टनंट जनरल जॉर्ज कूपरच्या यांच्या स्वागतार्थ टॉवर बांधून घेतला होता.

चौरा बझार क्लॉक टॉवर, लुधियाना

रानी विक्टोरियाच्या आठवणीत या टॉवरची निर्मिती झाली. ‘घंटा घर’ म्हणून हा परिसर ओळखला जातो. लुधियानाच्या जुन्या ठिकाणांपैकी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.

सिकंदराबाद टॉवर, हैद्राबाद

हा टॉवर म्हणजे सिकंदराबादची ओळख आहे. याची निर्मिती ब्रिटिशांनी केली आहे.

देहरादून क्लॉक टॉवर

देहरादून मधील घंटा घर किंवा क्लॉक टॉवर हे शहराच्या मध्यभागी आहे. या क्लॉक टॉवरला ६ घड्याळं असून सर्व घड्याळं आजही काम करत आहेत. देहरादून मधील जुन्या पुराण्या इमारतींमध्ये याची गणना होते.

घंटा घर, मिर्झापूर

मिर्झापुर महानगरपालिकेच्या इमारतीवर हा टॉवर आहे. स्थानिक लोक याला घंटा घर म्हणतात. १८८१ साली मिर्झापूर रेल्वे स्टेशनपासून ३ किलोमीटरवर याची निर्मिती झाली.

घंटा घर, जोधपुर

जोधपुरमधील बाजाराच्या ठिकाणी हा टॉवर आहे. हा भाग म्हणजे अत्यंत वर्दळीचा समजला जातो. महाराजा सरदार सिंह यांनी या टॉवरची निर्मिती केली.

मिंट क्लॉक टॉवर, चेन्नई

जॉर्ज टाऊन, चेन्नई मध्ये हा क्लॉक टॉवर आहे. मिंट क्लॉक टॉवर हे चेन्नई मधील प्रमुख ४ क्लॉक टॉवर्सपैकी एक आहे.

क्लॉक टॉवर, म्हैसूर

या क्लॉक टॉवरला डोब्बा गाडीयारा किंवा बिग क्लॉक टॉवरच्या नावाने ओळखलं जातं. म्हैसूरच्या ऐतिहासिक भागात हे टॉवर उभे आहे. याच भागात डफरीन क्लॉक टॉवर नामक आणखी एक कमी उंचीचे क्लॉक टॉवर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या