वाल्हेरी येथील धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सातपुडच्या पर्वत रांगेतून उगम पावणारा व जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला वाल्हेरी येथील धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. वाल्हेरी हे ठिकाण तालुक्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या उत्तरेस सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. येथे जाण्यासाठी सोमावल गावावरून जाता येते. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी आजही या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत.
वाल्हेरी येथील धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण

चेतन इंगळे

मोदलपाडा ता.तळोदा - Modalpada Taloda

पावसाचे प्रमाण कमी असले तरी देखील या धबधब्यावर कुठलाही परिणाम होत नाही. येथे चहुबाजूने वेढलेल्या हिरव्यागार टेकडय़ा, वृक्ष, वेली या निसर्गाच्या सानिध्यामुळे या धबधब्याचे सौदर्य अजून ही खुलून दिसते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होतांना दिसून येते.

वाल्हेरी माता मंदिर परिसरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या दऱ्या-खोऱ्यातून कोसळणारे धबधबे, नागमोडी वाटा, कच्चा रस्ता, पक्षांची किलबिलाट, हिरवा शालू नेसलेल्या टेकड्या, असे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना एक मेजवानीच ठरत आहेत.

या पर्यटन स्थळांचा सर्व सुविधा-युक्त विकास व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून पर्यटन प्रेमींकडून होत आहे. या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत असते. येथे आलेल्या पर्यटकांना वाहने उभी करण्यापासूनच समस्येला सुरूवात होत आहेत. परिणामी वाल्हेरीच्या विकासासाठी 40 लाखांचा निधी उपलब्ध करूनही येथे येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी वेळोवेळी मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविषयी नाराजी

आहे.

वाल्हेरी येथील हा धबधबा आणि परिसरातील वनक्षेत्रात पर्यटकांना भटकंतीसाठी चांगली सोय असतानाही केवळ माहिती आणि शासनाकडून निर्माण करण्यात येणार्‍या सोयी सुविधा नसल्याने पर्यटकांना सातपुडा पर्यटनाचा आनंद लुटता येत नसल्याचे चित्र दिसून येते. या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांची मोठी संख्या असल्याने या ठिकाणी युवकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होऊ शकते, यासाठी शासनाकडून या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com