Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedया क्रीममध्ये दडलंय चिरतरुण त्वचेचे रहस्य

या क्रीममध्ये दडलंय चिरतरुण त्वचेचे रहस्य

सुंदर, नितळ, सुरकुत्या विरहित त्वचा जपानी महिलांच्या सौंदर्याची खासियत आहे. या महिलांची त्वचा पाहून त्यांच्या वयाचा अंदाज मोठ्या मुश्कीलीनेच लावता येतो. जपानी महिला स्वत:च्या त्वचेची निगा (Skin care) राखण्याच्या बाबतीत अतिशय जागरूक समजल्या जातात. त्यांचा अतिशय पौष्टिक, दैनंदिन आहार आणि त्या वापरत असलेली नैसर्गिक प्रसाधने देखील या दृष्टीने पूरक आहेत.

प्रसाधनांच्या बाबतीत बोलायचे झाले तर जपानमध्ये (Japan) घरच्याघरी (homemade) तयार करण्यात येणारे ‘राईस फेस क्रीम’ (Rice Face Cream) हे प्रसाधन अतिशय लोकप्रिय असून, अधिकाधिक महिला याचा वापर करताना आढळतात. हे क्रीम घरच्या घरी अतिशय सहज तयार करता येत असून, यासाठी आवश्यक साहित्य देखील अगदी सहज उपलब्ध होणारे आहे.

- Advertisement -

हे क्रीम तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे तांदूळ, एक लहान चमचा ग्लिसरीन (Glycerin), पाव चमचा अ‍ॅलो व्हेरा जेल (Aloe vera gel) , आणि तीन इ जीवनसत्वाच्या कॅप्स्युल्सची आवश्यकता आहे. हे क्रीम तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे तांदूळ (Rice ) दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यावे. तांदुळात कोणत्याही प्रकारचा कचरा रहाणार नाही, आणि त्यातील पाणी शुभ्रराहीपर्यंत हे तांदूळ परत परत पाण्यामधून धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये हे तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत.

दुसर्‍या दिवशी हे तांदूळ मऊ शिजवून घ्यावेत आणि हा भात थोडा थंड झाल्यांनतर चांगला कुस्करून घ्यावा. कुस्करलेला हा भात एकदा चाळणीतूनही गाळून घ्यावा, जेणेकरून भाताची शिते यामध्ये शिल्लक राहणार नाहीत. त्यानंतर भाताची ही पेस्ट एका बरणीमध्ये भरून घेऊन यामध्ये एक चमचा ग्लिसरीन (Glycerin), पाव चमचा अ‍ॅलो व्हेरा जेल (Aloe vera gel) आणि इ जीवनसत्वाच्या तीन कॅप्सूल्स यामध्ये घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

हे राईस क्रीम (Rice cream) फ्रीजमध्ये ठेवावे. हे क्रीम फ्रीजमध्ये ठेवल्याने सहा ते सात दिवस चांगले रहाते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हे क्रीम चेहर्‍यावर लावावे. या पेस्टमध्ये तांदुळाच्या ऐवजी तांदुळाच्या पिठाचा वापरही करता येऊ शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या