कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा ?

sunset in nashik
sunset in nashik

पिवळे तांबूस उन कोवळे पसरे चौफेर

ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर...

पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा

कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा ?

ही सुर्यास्ताची वर्णन करणारी कवी भा.रा.तांबे यांची कविता किती समर्पक आहे.

निसर्गात रोजच सगळीकडे रंगांची खैरात दिसते. प्रत्येक पहाट म्हणजेच पूर्वेकडून सूर्याचे आगमन सांगणाऱ्या केशरी रंगाने होते. आकाशाच्या काळ्या-निळ्या बॅकड्रॉपवर हा केशरी-लाल रंग किती खुलून दिसतो. संध्याकाळीही तशीच रमणीय असते. तीच रंगसंगती, पण आता विरुद्ध दिशेला- पश्चिमेला सुर्यास्त होतो. सकाळच्या झुंजूमुंजू प्रकाशात किंवा संध्याकाळच्या संधिप्रकाशात शांतपणे उभे राहून सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहणे हा स्वत:लाच शांत करणारा समय असतो. यामुळे प्रत्येक हिल स्टेशनवर सनराइज आणि सनसेट पॉइंट असतातच. नाशिकमधील सायखेडा- चांदुरी रस्तावरुन सुर्यास्ताचे सतीश देवगिरे यांनी घेतलेले हे मनमोहक छायाचित्र...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com