जगात वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती आढळतात. आपल्यातील वैशिष्ट्यांमुळे ते लाोक वैशिष्ट्यपूणर्ण ठरतात अशाच काही व्यक्तींची माहिती...

शार्लोट गारसाईड हे जगातील सर्वात बुटकी व्यक्ती आहे. शार्लोटला ‘डॉर्फीझम’ आहे, म्हणजेच तिच्या शरीराची वाढ खुंटलेली आहे. जगातील सर्वात बुटकी व्यक्ती असण्याचा विक्रम गिनीस बुक ऑॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शार्लोटच्या नावावर आहे.

जेव्हा काही महिन्यांपूर्वी शार्लोट शाळेमध्ये जाऊ लागली, तेव्हा तिची उंची केवळ 68 सेंटीमीटर असून वजन फक्त नऊ पाउंड होते. पण वास्तविक त्या वेळी शार्लोटचे वय पाच वर्षांचे असून, ती दिसत मात्र एखाद्या नवजात अर्भकाप्रमाणे होती. शार्लोटला भेट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचे वजनही तिच्या पेक्षा जास्त असल्याने तिला ते उचलून घेता येणे शक्य नव्हते. वयाच्या पाचव्या वर्षापासून शाळेमध्ये जाणे, ही शार्लोटसाठी खूप मोठी बाब ठरली, कारण ती जेमतेम वर्षभराच जगू शकेल असा शार्लोटच्या डॉक्टरांचा कयास तिने सपशेल फोल ठरविला.

एलेन रॉबर्ट या फ्रेंच व्यक्तीला ‘रियल लाईफ स्पायडरमॅन’ म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे कुठल्याही दोराच्या किंवा तत्सम आधाराच्या सहाय्याच्या विना, उंच उंच इमारतींवर लीलया चढण्याचे विलक्षण कौशल्य एलेनला साध्य आहे. एलेनला लोक ‘ह्युमन स्पायडर’ असे ही म्हणतात.

शहरातील गगनचुंबी इमारती एलेन केवळ आपल्या ‘क्लाइम्बिंग शूज’च्या जोरावर चढून जातो. सुरुवातीला ही थरारक कृत्ये एलेन अगदी पहाटेच्या वेळी पार पाडत असे, कारण बहुतेकवेळी असे करण्यासाठी लागणारी स्थानिक प्रशासनाची परवानगी डावलून तो आपली चढाई करीत असे. त्यामुळे इमारतींवर चढाई करताना पाहिले गेल्यावर एलेनला अनेकदा अटकही झाली होती.

अखेरीस एलेनने आपल्या या धाडसी कृत्यांकरिता रीतसर सरकारी परवानगी मिळविली आणि त्याचबरोबर त्याला अनेक प्रायोजकही मिळाले. एलेन रॉक क्लाइम्बिंगमध्ये निष्णात असून, इमारतींवर चढाई करताना हे प्रशिक्षण आपल्या कामी येत असल्याचे तो म्हणतो. आतापर्यंत एलेनने आयफेल टॉवर, सिडनी ऑॅपेरा हाऊस आणि बुर्ज खलिफा या इमारतींवर यशस्वी चढाई केली आहे.

डीन कार्नाझेस अशी व्यक्ती आहे, जिला शारीरिक थकवा ठाऊक नाही. किती ही शारीरिक श्रम केले, तरी डीनला थकवा येतच नाही. त्यामुळे अजिबात विश्रांती न घेता डीन तासंतास श्रम करू शकतो. आपल्या शरीराला उर्जा मिळते शरीरातील ग्लुकोजमधून. ग्लुकोजबरोबर शरीरामध्ये लॅक्टेटही तयार होत असते. जर शरीरामध्ये लॅक्टेटचे प्रमाण वाढले तर शरीर लॅक्टीक अॅसिड तयार करू लागते आणि त्यामुळे शरीरातील स्नायू व्यवस्थित काम करू शकत नाहीत. परिणामी शरीरामध्ये क्रँप्स येऊ लागतात, आणि शरीर थकते. पण डीनच्या शरीरावर मात्र लॅक्टेट कोणताच परिणाम करू शकत नसल्याने डीनला कधीच थकवा येत नाही.

शाळेमध्ये असताना डीनने रनिंग टीममध्ये सह्भागी होऊन स्पर्धेमध्ये भाग घेतला. रनिंग ट्रॅक वरील डीनची सातत्याने धावण्याची क्षमता पाहून सर्वांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. टीममधील इतर स्पर्धकांनी ट्रॅकवर पंधरा लॅप्स ( फेर्या ) पूर्ण केल्या, मात्र डीन धावतच राहिला. तब्बल 105 लॅप्स पूर्ण केल्यानंतरही डीनच्या चेहर्यावर थकव्याचे चिन्ह नव्हते. त्याच्या या अभूतपूर्व शारीरिक क्षमतेमुळे डीनने पन्नास दिवसांमध्ये पन्नास मॅरेथॉन पळण्याचा विक्रम केला आहे.

मिशेल लोतितो या व्यक्तीची ओळख ‘मिस्टर ईट एव्हरीथिंग’, म्हणजेच कुठलीही वस्तू खाऊ शकणारा माणूस अशी आहे. लोतितो धातूंच्या वस्तू, काच, रबर, आणि अश्या इतरही अनेक वस्तू, ज्या खाण्याचा आपण विचारही करू शकत नाही, अश्या सर्वच वस्तू अगदी सहज खाऊन फस्त करतो. इतकेच नव्हे, तर लोतितोने आजवर अनेक सायकली, टीव्ही, आणि चक्क एक ‘सेस्ना 150’ नामक विमानही खाऊन पचविले आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी लोतितोने अश्या प्रकारच्या चित्रविचित्र वस्तू खाण्यास सुरुवात केली. अश्या वस्तू खाऊन दाखविण्यासाठी लोतितो खास ‘शो’ही करतो. पण आश्चर्याची गोष्ट ही, की अश्या अपायकारक वस्तू खाल्ल्यानंतरही लोतितोला कोणत्याही प्रकारच्या व्याधींनी कधीही ग्रासलेले नाही.