Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसिटी बसेस स्मार्ट मग बसस्थानक कधी होणार ?

सिटी बसेस स्मार्ट मग बसस्थानक कधी होणार ?

नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस (Rain) नाशिकमध्ये (Nasik) सुरु आहे. या पावसात काही भागातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. नाशिकमध्ये ‘स्मार्ट बसेस’ (smart buses )सुरु झाल्या असल्या तरी निमाणी बसस्थानक मोठ-मोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना कसरत करत बसमध्ये बसावे लागत आहे.

- Advertisement -

नाशिकमधील (Nashik) आडगाव नाका, रामकुंड, औरंगाबाद नाका येथील रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहे. निमाणी बस स्थानकावरून दिवसभरात बसच्या शेकडो फेऱ्या होतात. हजारोंच्या संख्येने प्रवासी या बस स्थानकावरून ये-जा करतात, अशा बस स्थानकाची अवस्था खड्डे पडून एखाद्या तळ्यासारखी झाली आहे.बस स्थानकात जातानाच खड्ड्यांतून वाट शोधण्याची वेळ आली आहे. मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असल्याने त्या पाण्यातूनच बस स्थानकात जावे लागत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसमुळे येथील पाणी बाजूला बसच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडते. अशा परिस्थितीत येथे थांबणेदेखील प्रवाशांना मुश्किल होऊ लागले आहे.

देशात ऑक्सिजन मृत्यू : केंद्र- राज्य सरकारचे राजकारण

- Advertisment -

ताज्या बातम्या