Photo Gallery : स्व. श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव मोजतेय अखेरच्या घटका

Photo Gallery :  स्व. श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव मोजतेय अखेरच्या घटका

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे (Nashik NMC) जलतरण तलाव सुरु झाले आहेत. गेली दोन वर्षे बंद असलेले जलतरण तलाव (Swimming Tank) सुरु झाल्यामुळे नाशिककरांनी समाधान व्यक्त केले होते. एकीकडे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जलतरण तलाव सुरु झालेले असताना दुसरीकडे पंचवटी परिसरातील जलतरण तलाव मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. परिसरातील नागरिक हा जलतरण तलावदेखील सुरु करण्यात यावा अशी मागणी (Demand) करत आहेत....

पंचवटी परिसरातील मीनाताई ठाकरे स्टेडीयमच्या परिसरात असलेल्या स्व. श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव (Shrikant Thackeray Swimming Tank) समस्यांनी वेढला गेला आहे. येथील तलावाच्या आजूबाजूला असलेल्या खोल्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. दुसरीकडे, प्रचंड गवत याठिकाणी वाढले आहे. नियमित देखभाल होत नसल्यामुळे विद्रूप स्वरूप या जलतरण तलावाला प्राप्त झाले आहे.

Related Stories

No stories found.