Photo शेगावातून श्रींची पालखी निघाली विठ्ठलाच्या भेटीला

पालखीचे यंदा ५३ वे वर्ष, पायी प्रवास ७५० किमीचा व ३३ दिवसांचा
Photo शेगावातून श्रींची पालखी निघाली विठ्ठलाच्या भेटीला

दिपक सुरोसे

शेगाव - Shegaon

'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" अशा जयघोषात तीर्थक्षेत्र (shegaon) शेगावतून श्रीची पालखी आज सकाळी सातच्या सुमारास मदिरातुन पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान केले.

यावेळी श्रींच्या रजत मुखवट्याची संस्थानचे सेवाधारी विश्‍वस्त मान्यवरांनी विधिवत पूजा केली. (Ashadi Ekadashi) आषाढी एकादशीसाठी श्रींची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते.

गत ५३ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ही पालखी निघणार असल्याने मंदिर परिसरातील भाविकांची पहाटेपासूनच गर्दी झाली होती. संस्थाननचे सेवाधारी विश्‍वसत मंडळ यांच्या हस्ते रजत मुखवट्याची पूजा करण्यात आल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली.

याप्रसंगी संस्थानचे सर्व विश्‍वसत भाविकभक सेवेकरी मान्यवर उपस्थित होते. श्रींची पालखी संस्थानच्या प्रांगणातून निघाली.

टाळ, मृदंगाच्या गजरात वातावरण झाले भक्तिमय श्रींच्या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री सत गजानन महाराज मंदिरातून शिस्तबद्ध पद्धतीने झाली. यात टाळकरी, मृदंगवादक, कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते.

पालखी सोहळा पाहण्यासाठी व श्रीच्या पालखीच्या दर्शनासाठी विदर्भ, मराठवाडा, जळगांव खानदेशातील व शहरातील भाविकांची गर्दी उसळली होती. व ठिकठिकाणी महिला भाविकाकडून पालखी मार्गवर सुंदर रागोळी काढले होते व बाहेर गांवाहुन हजारो भाविकभक्त शहरात आले होते त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

श्रींची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमिटर प्रवास करत आषाढ शु-९ शुक्रवार ०८ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल.१२ जुलै पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील. आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर आषाढ शु.१५ बुधवार १३ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल.

दि.३ ऑगष्ट २०२२ रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.

पालखीसोबत डॉक्टरांचे आरोग्य पथक, पाण्याची सोय - श्रींच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांचा समावेश असल्याने पिण्याचे पाणी, आरोग्य पथक, डॉक्टर यांचाही समावेश आहे.

३३ दिवसांचा प्रवास

श्री सत गजानन महाराज पालखीचे यंदा ५३ वे वर्ष पालखीचा पायी प्रवास ७५० किमीचा व ३३ दिवसांचा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com