Monday, April 29, 2024
HomeUncategorizedPhoto जळगावात अशी निघाली ‘शिवज्योत रॅली’

Photo जळगावात अशी निघाली ‘शिवज्योत रॅली’

जळगाव – jalgaon

शहरातील सार्वजनिक शिवजयंती (Shiva Jayanti) समितीतर्फे गुरुवार, दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी महात्मा फुले व्यापारी संकुलातील (Mahatma Phule Merchant Complex) क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास वंदन करून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवज्योत रॅली काढून शिवजयंती महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.

- Advertisement -

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा तथा स्वच्छतामंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी याप्रसंगी शिवज्योत रॅलीला भगवा झेंडा दाखविला.

यावेळी जळगावच्या (Mayor) महापौर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा सौ.जयश्री सुनिल महाजन (Jayashree Sunil Mahajan) यांनी या रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवित शिवज्योत धरली.

यावेळी महिलांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.

महात्मा फुले व्यापारी संकुलापासून काढण्यात आलेल्या शिवज्योत रॅलीचे महापालिकेसमोर स्वागत करण्यात आले.

त्यानंतर रेल्वे स्थानक मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवज्योत रॅलीचा समारोप करण्यात आला.

याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या उपकार्याध्यक्षा सौ.अश्विनी देशमुख, सौ.सुचिता पाटील, विनोद देशमुख, महापालिका गटनेते अनंत ऊर्फ बंटी जोशी,

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे निमंत्रक शंभू पाटील, मुविकोराज कोल्हे, साहस फाऊंडेशन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव सुकाणू समितीच्या सौ.सरिता माळी-कोल्हे, नगरसेविका सौ.ज्योती चव्हाण, अ‍ॅड.शुचिता हाडा, सौ.दीपमाला काळे, सौ.उज्ज्वला बेंडाळे, सौ.संगीता बरडे, सौ.रेखा पाटील, सौ.मंगला पाटील, सौ.मंगला बारी, सौ.प्रतिभा सुर्वे, सौ.अनिता पाटील, सौ.कल्पना वाणी, सौ.देवयानी कोल्हे, सौ.ज्योती वाघ,सौ.लिना चंदनकर, सौ.मंजुषा भिडे, सौ.प्रतिभा कोळी, सौ.मेघा जाधव, सौ.पूनम जोशी, सौ.मीनाक्षी पाटील, सौ.कांचन पाटील, पुरुषोत्तम चौधरी, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे खजिनदार खुशाल चव्हाण, फईम पटेल, विकास मराठे यांच्यासह सावर्जनिक शिवजयंती समितीचे सर्व पदाधिकारी, महिला व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ.लिना चंदनकर, सौ.मंजुषा भिडे, सौ.प्रतिभा कोळी, सौ.मेघा जाधव, सौ.पूनम जोशी, सौ.मीनाक्षी पाटील, सौ.कांचन पाटील, पुरुषोत्तम चौधरी, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे खजिनदार खुशाल चव्हाण, फईम पटेल, विकास मराठे यांच्यासह सावर्जनिक शिवजयंती समितीचे सर्व पदाधिकारी, महिला व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या